Chanakya Niti: पैसे होत्याचे न्हवते व्हायला वेळ लागणार नाही, चाणक्य नीति मधील या पाच गोष्टी कायम लक्षात ठेवा

2 Min Read
It wont take long to get rid of money read these five points from Chanakya Niti for money

Chanakya Niti For Money: आचार्य चाणक्य हे भारताचे महान तत्त्वज्ञ आणि कटुनीती तज्ज्ञ मानले जातात. त्यांची महान विचारशक्ती आणि महान बुद्धी च्या जीवावर राजा चंद्रगुप्त मौर्याला पूर्ण भारत जिंकण्यात सिंहाचा वाटा उचलला. त्यांनी मानवी जीवनातील यश-अपयशाच्या अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांचे शब्द चाणक्य नीतीमध्ये संग्रहित केले आहेत. चाणक्य नीतीनुसार, व्यक्तीने आपल्या काही सवयी वेळीच सुधारल्या पाहिजेत, अन्यथा तो श्रीमंती वरून गरीब व्हायला वेळ लागत नाही.

चाणक्य नीति मध्ये आचार्य चाणक्यांनी 5 मुद्दे सांगितले आहेत ते खालील प्रमाणे

मेहनत

चाणक्य नीति च्या मते माणसाने फक्त नशिबावर अवलंबून नाही राहिले पाहिजे. त्याने स्वतःचे नशीब स्वतः घडविले पाहिजे व मेहनतीसारख्या दुसरा दोस्त कोणीच नाही. त्यामुळे त्याने मेहनत करण्यात कधीही माघार घेऊ नये.

सकाळी लवकर उठणे

आचार्य चाणक्य म्हणतात की जो माणूस सकाळी लवकर उठायला आळस करतो, त्याचा पूर्ण दिवस आळसात जातो व अशा आळशी माणसाकडे माता लक्ष्मी व कुबेर म्हणजेच धनसंपत्ती कधीही टिकत नाही. मग तो कितीही श्रीमंत असला तरी त्याला भिकारी व्हायला वेळ लागत नाही.

दान

आचार्य चाणक्य म्हणतात की माणसाने दान हे तेवढेच करावे की ज्याने त्याला काही अडचण येणार नाही. आपल्या चादरी पेक्षा जास्त पाय पसरू नयेत म्हणजे थोडक्यातच आपल्या कमाई पेक्षा जास्त दान देऊ नये.

पैशाची किंमत

आचार्य चाणक्य म्हणतात जो माणूस पैशाची किंमत करत नाही त्याचा गैरवापर करून कुठेही उडवा उडवी करतो त्याच्याकडे धनसंपत्ती कधीच टिकत नाही तो किती श्रीमंत असला तरी तो लवकरच भिकारी होतो. व याउलट जो माणूस पैशाची किंमत करतो व त्याला साठवून ठेवतो त्याची काळजी घेतो तोच माणूस श्रीमंत राहतो.

अनुभव

आचार्य चाणक्य म्हणतात की व्यक्तीला त्याच्या अनुभवावरून शिकता आल पाहिजे. त्याला कळल पाहिजे की कोणती माणसे चांगली आहेत आणि कोणती वाईट त्याला त्या अनुभवावरून समजल पाहिजे. आचार्य चाणक्य म्हणतात अनुभवासारखा दुसरा गुरु नाही.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम