Shaniwar Upay: शनिवारी करा फक्त हे 4 उपाय, करताच शनिदोषाच्या त्रासातून व्हाल मुक्त

2 Min Read
Shaniwar Upay In Marathi For Shani Dosh

Shaniwar Upay In Marathi : शनिवार हा दिवस शनिदेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. शनिवार च्या दिवशी मनोभावे शनि महाराजांची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात व सुख शांती लाभते.

Shani Dosh Upay : शनिदेवाला न्यायाची आणि कर्माचे फळ देणारी देवता असे म्हटले जाते. शनिदेव व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ देतात. यामुळेच शनिदेवाला न्यायाधीशाची पदवी मिळाली आहे. असे म्हटले जाते की, चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेवाची सदैव कृपा राहते तेच वाईट कर्म करणाऱ्या व्यक्तीवर शनिदेवाचा कोप होतो. शनिवार हा शनिदेवाच्या पूजेसाठी सर्वोत्तम दिवस मानला जातो. या दिवशी विधीनुसार शनि देवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्या दूर होतात.  त्याचबरोबर जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि दोष असेल तर शनिवारी काही उपाय करून शनिदोष दूर करता येतो. चला तर मग जाणून घेऊया शनिदोषाच्या त्रासातून मुक्त होम्यासाठी काही उपाय.

1: शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा

शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि शनिदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी शनिवारी शनिदेवाच्या मंत्रांचा जप करावा. तसेच या दिवशी शनि चालिसाचे पठण करावे.

2:  पिंपळाच्या झाडाची पूजा करावी 

शनिदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी. शनिवारी सूर्योदयापूर्वी पिंपळाच्या झाडाची पूजा करून जल अर्पण करावे आणी पिंपळाच्या झाडाजवळ तेलाचा दिवा लावल्यास शनिदोषापासून मुक्ती प्राप्त होते.

3: शनिवारी हनुमानाची पूजा करने 

शनिवारी हनुमानाची पूजा केल्याने शनिदेव प्रसन्न होतात तसेच शनिदोषापासून मुक्ती मिळते.

4: या गोष्टींचे दान करा

शनिदेवाची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी काळे तीळ, मोहरीचे तेल, काळे उडीद काळी छत्री, आणि चप्पल यांचे दान करावे. यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते.

(टीप : वर देण्यात आलेली सर्व माहिती सांगलीन्यूज.कॉम केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून सांगलीन्यूज.कॉम कोणताही दावा करत नाही.)

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम