EV Subsidy 2024: करा गुढीपाडव्याला इलेक्ट्रिक वाहन खरेदी; मीळवा 50,000 रुपयांपर्यंत सबसिडी

3 Min Read
इलेक्ट्रिक वाहन खरेदी करा केंद्र सरकारच्या नवीन ईव्ही सबसिडी 2024 योजनेअंतर्गत रु. 50000 पर्यंत सबसिडी मिळवा

EV Subsidy : भारतातील वाढत्या प्रदूषणस आळा घालण्यासाठी (Ministry of Heavy Industries) अवजड उद्योग मंत्रालयाने देशात ई-वाहनांची विक्री (electric vehicles sell in india) वाढविण्यासाठी एका नवीन योजनेची घोषणा केली आहे. एप्रिल 2024 ते जुलै 2024 पर्यंत चार महिन्यात ही योजना अंमलात असेल. या ev अनुदान महाराष्ट्र योजनेसाठी केंद्र सरकार तब्बल 500 कोटी इतके रुपये खर्च करणार आहे.

अवजड उद्योग मंत्रालयाने देशात (E vehicle) ई-व्हेईकलला चालना देण्यासाठी या नवीन योजनेची घोषणा केली आहे. एप्रिल 2024 ते जुलै 2024 या चार महिन्यात ही ev सबसिडी 2024 योजना राबवली जाईल. या योजनेसाठी सरकार 500 कोटी रुपये खर्च करत आहे. ही योजना (two wheeler ev & three wheeler ev) इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक तीनचाकीसाठी आहे.

वाढत्या प्रदूषणस आळा घालण्यास मदत होऊन भारतात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढावी म्हणून ही योजना सुरु करण्यात आली आहे. विकसित देशांप्रमाणे आपल्या देशात इलेक्ट्रिक वाहन उत्पादनाला गती देण्यासाठी दुसरा टप्पा (फेम-2) 31 मार्च, 2024 रोजी समाप्त होणार आहे. अवजड खात्याचे माननीय मंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी ई-वाहन योजना (EM PS 2024) घोषीत केली त्याचबरोबर मोदी सरकार ई-वाहन योजनेसाठी (ev scheme) वचनबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

तुम्हाला नक्की आवडेल 👉 2024 मध्ये लवकरच लाँच होणाऱ्या टॉप ‘5’ जबरदस्त इलेक्ट्रिक स्कूटर.

या Electric vehicle subsidy 2024 योजनेनुसार, प्रति दुचाकी वाहनासाठी 10,000 रुपयांची मदत देण्यात येईल. त्यानुसार जवळपास 3.3 लाख दुचाकी वाहनांना मदत पोहचविण्यात येणार आहे. तर ई-कार्ट, ई-रिक्षा या तीन चाकी वाहनांसाठी 25,000 रुपयांपर्यंत मदत देण्यात येणार आहे. 41,000 वाहनांपेक्षा अधिक वाहनांचा यामध्ये समावेश केला गेला आहे. मोठे तीनचाकी वाहन खरेदी केल्यास 50,000 रुपयांची मदत देण्यात येईल. फेम-2 अंतर्गत 31 मार्च, 2024 पर्यंत अथवा मदत निधी येईपर्यंत विक्री करण्यात येणाऱ्या ई-वाहनांना ही मदत दिली जाईल.

आजची लेटेस्ट अपडेट 👉 Honda Activa EV Scooter: ‘या’ तारखेला होणार लाँच; समजली का किंमत.

अवजड मंत्रालयाने (MHI) आणि IIT रुरुकी यांच्यासोबत पार्टनरशिप केली आहे. नव्या तंत्रज्ञानास प्रोत्साहन देण्यासाठी आणि ऑटोमोटिव्ह आणि इलेक्ट्रिक वाहन क्षेत्रात नवनवीन प्रयोगासाठी, विस्तारासाठी करारही करण्यात आला आहे. मंत्रालयाने दिलेल्या एकूण 19.87 कोटी रुपयांचे अनुदान आणि उद्योगात भागीदारांसाठी जादाचे 4.78 कोटी रुपयांचे योगदान देण्यात येईल. त्यानुसार या योजनेसाठी 24.66 कोटींचा खर्च येणार आहे.

देशात इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी सरकारने  प्रथम फेम 1 योजना सुरु केली. नंतर सरकारने फेम 2 योजना राबवली. या योजनेत इलेक्ट्रिक दुचाकी आणि इलेक्ट्रिक चार चाकी वाहन खरेदीवर केंद्र सरकार त्याचबरोबर राज्य सरकारकडून सबसिडी देण्यात येते. या सबसिडीचा थेट फायदा ग्राहकांना होणार आहे. आता आपण स्वस्तात इलेक्ट्रिक वाहन (EV)  खरेदी करू शकता. त्यामुळे आता आपण जर येणारा गुढीपाडवा किंवा त्यानंतर येणाऱ्या सणाला ई-वाहन खरेदी करणार असाल तर आपल्याला या ev अनुदान महाराष्ट्र योजनेचा फायदा घेता येणार आहे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम