Gold Silver Rate Today : सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीना ग्रहण; जाणून घ्या सोन्या चांदीची आजची किंमत १२ मार्च २०२४

3 Min Read
सोन्या चांदीची आजची किंमत १२ मार्च २०२४

Gold Silver Rate Today 12 March 2024 : सोने आणि चांदीच्या दरात या महिन्यात फक्त दहा दिवसांतच चांगली तेजी पाहायला मिळत होती. 1 मार्च पासून दररोज सोन्याच्या किमतीचा एक नवा विक्रम पाहायला मिळाला. सोन्याने 66,000 चा टप्पा ओलांडला तर चांदीने देखील 75 हजारांचा टप्पा ओलांडला. फक्त दहाच दिवसांत सोने 3,430 रुपयांनी वाढले आणी चांदी देखील 2300 रुपयांनी वाढली. त्यामुळे मार्च महिन्यात सोने खरेदी करणाऱ्यांना खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागले. पण या आठवड्यात सोन्या चांदीच्या वाढत जाणाऱ्या किमतीना ग्रहण लागले. आता अशी आहे सोन्या चांदीची आजची किंमत १२ मार्च २०२४ (Gold Silver Price Today 12 March 2024):

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

लेटेस्ट अपडेट 👉 Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीला ब्रेक, अशी आहे सोन्याचांदीची आजची किंमत १७ मार्च २०२४.

सोन्याचे नवे विक्रम : मार्चच्या पहिल्या दहा दिवसांत सोन्याने रोज एक नवा विक्रम नोंदवला. 1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत सोन्यात 3,430 रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्याच्या शेवटच्या सत्रात देखील सोने महागले. 7 मार्च रोजी सोने 400 रुपयांनी महागले. 8 मार्च रोजी किंमतीत 170 रुपयांची भर पडली. 9 मार्च रोजी सोन्यात 540 रुपयांची वाढ झाली. तेच 10 व 11 मार्च रोजी किंमतीत बदल दिसला नाही. पण आता सोन्याच्या किंमतीत घसरण होण्याची चिन्हे दिसत आहेत.

गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,890 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,410 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

मार्च महिन्यात चांदीत 3 हजार रुपयांची वाढ झाली. गेल्या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली. अखेरच्या टप्प्यात 7 मार्च रोजी चांदीची किंमत 500 रुपयांनी वाढली. 8 मार्च रोजी देखील चांदीत वाढ झाली. 9 मार्च रोजी चांदीत 200 रुपयांची दरवाढी झाली तेच 11 मार्च रोजी 100 रुपयांनी चांदी कमी झाली. गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव आता 75,600 रुपये झाला आहे.

सोन्याचा 14 ते 24 कॅरेटचा दर : इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA), नुसार सोने आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 65,646 रुपये, 23 कॅरेट 65,383 रुपये, 22 कॅरेट सोने 60,132 रुपये झाले. तेच 18 कॅरेटसोने 49,235 रुपये, 14 कॅरेट सोने 38,403 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले.

एक किलो चांदीचा भाव 72,547 रुपये झाला. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्या चांदीवर कुठलाही कर नसतो. मात्र सराफा बाजारात कराचा समावेश होत असल्याने भावात बदल दिसून येतो.

सोन्या चांदीची किंमत घरबसल्या जाणून घ्या : सोने-चांदीच्या किंमती तुम्हाला आता घरबसल्या पण सहजपने जाणून घेता येतील. सोने चांदीचे रोजचे नवीनतम भाव जाणून घेता येतील. आपण 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सोन्याचे सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकतात.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम