Gold Silver Rate Today | सोन्याच्या बुलेट ट्रेनला ब्रेक चांदी सुसाट; जाणून घ्या आज 13 मार्च 2024 रोजीचा सोन्या चांदीचा दर

4 Min Read
आज 13 मार्च 2024 रोजी सोन्याचा चांदीचा दर

Gold Silver Rate Today 13 March 2024 : मागील आठवड्यात सोने आणि चांदीने वाढीचा वेग धरला होता. पण आता त्या वेगाला ब्रेक लागल्याचे दिसत आहे. मागील दोन दिवसांत मौल्यवान धातूत कोणतीच मोठी अपडेट आली नसल्याचे पाहायला मिळतेय.

मार्च महिना सुरु झाल्यापासून पहिल्या 10 दिवसात सोने आणि चांदीच्या भावाने रेकॉर्ड ब्रेक केले. मार्च महिन्यात गेल्या आठवड्यापर्यंत मोठी दरवाढ ग्राहकांनी अनुभवली. सोने आणि चांदीच्या भावाने रेकॉर्ड ब्रेक केले. अवघ्या काही काळातच सोन्याच्या किंमतीने 66,000 चा टप्पा सहज पार केला तर चांदीने देखील तीच कमाल दाखवत 75,000 चा टप्पा पार केला. जवळजवळ 2 महिने सोन्या चांदीच्या किंमतीत चढ उतार होतच होते पण मार्च 1 ते 10 मार्च दरम्यान सोन्यात खरी तेजी पाहायला मिळाली. अवघ्या दहाच दिवसांत सोने 3,430 रुपयांनी तर चांदी 2300 रुपयांनी महागली. चला तर मग जाणून घेऊया आज 13 मार्च 2024 रोजी सोन्याचा चांदीचा दर (Gold Silver Price Today 13 March 2024) :

पाहायला विसरू नका 👉 सोन्याच्या कानातल्यांचे 7 जबरदस्त नवीन डिझाइन 2024, Stunning New Designs of Gold Earrings.

लेटेस्ट अपडेट 👉 Gold Silver Rate Today : सोन्या चांदीने दिला ग्राहकांना दिलासा; जणून घ्या सोन्याचांदीची आजची किंमत १४ मार्च २०२४.

1 मार्चपासून ते 10 मार्चपर्यंत 3,430 रुपयांनी सोने महागल्याचे आपण पहिलेच. मागील आठवड्याच्या शेवटच्या सत्रात देखील सोने महागले. पण आता या आठवड्यात सोन्याच्या दरवढीला ब्रेक लागल्याचे पाहायला मिळतेय, 10 व 11 मार्च रोजी सोन्या चांदीच्या किंमतीत बदल दिसला नाही. सुसाट वेगाने सुटलेल्या सोन्या चांदीच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागला. काल 12 मार्च रोजी किंमतीत किरकोळ घट झाली . गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,880 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,400 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

चांदीची काय अवस्था

मार्च महिन्यात चांदीची किंमत जवळपास 3 हजारांनी वाढली. गेल्या आठवड्यात चांदीत 2300 रुपयांची वाढ झाली होती. या आठवड्यात सोमवारी पहिल्याच दिवशी चांदी 100 रुपयांनी उतरली तर काल 12 मार्च रोजी चांदीच्या किंमतीत 500 रुपयांची वाढ झाली, गुडरिटर्न्सनुसार, एक किलो चांदीचा भाव 76,100 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव :

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार, सोन्याची किंमत कमी झाली आणि चांदी महागली. 24 कॅरेट सोने 65,566 रुपये, 23 कॅरेट 65,303 रुपये, 22 कॅरेट सोने 60,059 रुपये आहे.18 कॅरेट 49,175 रुपये, 14 कॅरेट सोने 38,356 रुपये प्रति 10 तोळा झाले आहे. तेच एक किलो चांदीचा भाव 72,675 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसततो. पण सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने आपल्याला भावात फरक दिसून येतो.

घरबसल्या जाणून घ्या सोन्या चांदीचे भाव

सोने-चांदीच्या किंमती आपल्याला घरबसल्या देखील जाणून घेता येईल. आपल्याला सहजपणे सोने-चांदीचे ताजे भाव जाणून घेता येतील. सोन्या चांदीच्या किंमतीत करांचा समावेश असल्याने शहरानुसार किंमतीत बदल दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर करण्यात येतात. आपण 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे भाव जाणून घेऊ शकता.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम