Gold Silver Rate Today : सोन्या चांदीने दिला ग्राहकांना दिलासा; जणून घ्या सोन्याचांदीची आजची किंमत १४ मार्च २०२४

4 Min Read
आज 14 मार्च 2024 रोजी सोन्याचांदीची किंमत

Gold Silver Rate Today 14 March 2024 : मागील आठवड्यात सोन्या चांदीच्या किंमतीत आलेल्या तुफान तेजीला या आठवड्यात उतरती काळा लागली. तेजीने वाढत चाललेला सोन्याचा भाव त्याच तेजीने मागारी फिरला. सोन्याचंदीचे दर कमी झाल्याने सोने चांदी खरेदी करणाऱ्यांना थोडा दिलासा मिळाला.

मार्च महिना सुरु झाल्यापासून सोने आणि चांदीच्या दरात तेजी आली होती सोन्या चांदीचे दर झपाट्याने वाढू लागले होते. त्यामुले 10 मार्च पर्यंत सोन्या चांदीचे दागिबे खरेदी करणाऱ्यांना ते जास्त किंमतीत खरेदी करावे लागले. या आठवड्यात मात्र आणि चांदीच्या दराला उतरती काळा लागली. या तीन दिवसांत दर उतरू लागल्याने ग्राहकांना थोडा दिलासा मिळाल्याफचे चित्र आहे. आता अशी आहे सोन्याचांदीची आजची किंमत १४ मार्च २०२४ (Gold Silver Price Today 14 March 2024) –

आजचा लेटेस्ट दर येथे तपासा 👉 Gold Silver Rate Today: सोन्याच्या किंमती पुनः उसळल्या; जाणून घ्या 15 मार्च 2024 रोजीचा आपल्या शहरातील सोन्या चांदीचा दर.

सोन्याला उतरती काळा 

मार्च महिना सुरु झाला आणी सुरुवातीच्या केवळ दहाच दिवसांत (Gold Price) सोन्याचे भाव 3,430 रुपयांची वाढले. मागच्या आठवड्यात अखेरच्या टप्प्यात देखील दरवाढ पाहायला मिळाली. या चालू आठवड्यात मात्र दरवाढीच्या पर्वास उतरती काळा लागली. 10 व 11 मार्च रोजी सोन्याची किंमती स्थिर होती. 12 मार्चला सोन्याच्या किंमती किरकोळ कमी झाल्या. 13 मार्च रोजी सोने 420 रुपयांनी कमी झाले. गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 60,500 रुपये प्रति 10 ग्रॅम असे तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 65,900 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

चांदीसुद्धा उतरली 

मार्च महिन्यात सुरुवतीच्या दहा दिवसांत सोन्यात आलेल्या तेजीबरोबर चांदीने देखील कमाल दाखवली केवळ दहाच दिवसात चांदी 3 हजार रुपयांनी वाढली. चालू आठवड्यात पहिल्या दिवशी सोमवारी चांदी 100 रुपयांनी उतरली. 12 मार्चला चांदीत 500 रुपयांनी दरवाढ झाली. तेच 13 मार्च रोजी एकच दिवसात चांदीत 900 रुपयांची घसरण झाली. गुडरिटर्न्सनुसार, आता एक किलो चांदीचा भाव 75,200 रुपये आहे.

14 ते 24 कॅरेटचा भाव

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), नुसार सोने आणि चांदी स्वस्त झाले आहे. 24 कॅरेट सोने 65,335 रुपये, 23 कॅरेट 65,073 रुपये, 22 कॅरेट सोने 59,847 रुपये आहे.18 कॅरेट 49,001 रुपये, 14 कॅरेट सोने 38,221 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आले आहे. चांदीचा एक किलोचा भाव 72,469 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, शुल्क नसते. पण सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने सोन्या चांदीच्या किंमतीत फरक दिसून येते.

घरबसल्या जाणून घ्या सोने चांदीच्या किंमती

आपण सोने चांदीच्या किंमती घरबसल्या देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला 2 मिनिटात अगदी सहजपने सोने-चांदीचे नवीनतम भाव जाणून घेता येतील. त्यात स्थानिक कर, इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार सोन्या चांदीच्या किंमतीत फरक दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवारी आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर केल्या जातात. आपण 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे सोन्याचा आजच दर (Gold Rate Today) जाणून घेऊ शकतात.

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम