Gold Silver Rate Today : सोन्याने घेतली पुन्हा भरारी; जाणून घ्या सोन्याचांदीची आजची किंमत १६ मार्च २०२४

4 Min Read
सोन्याचांदीची आजची किंमत १६ मार्च २०२४

Gold Silver Rate Today 16 March 2024 : मार्च महिना सुरु होताच सोन्या चांदीच्या किंमतीत तुफान तेजी आली होती. मार्चच्या पहिल्या दहा दिवसात 1 ते 10 मार्च सोने चांदीच्या किंमती वाढत चालल्या होत्या या आठवड्याच्या सुरुवातीला किंमती वाढण्याचे सत्र थांबले. अखेरच्या टप्प्यात सोन्या चांदीच्या दरामध्ये परत तेजी आल्याचे पाहायला मिळत आहे. जागतिक घडामोडींमुळे हा परिणाम झाला आहे.

मागील आठवड्यात सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली होती. 1 ते 10 मार्च या दरम्यान सोने आणि चांदीने मोठी कमाल दाखवली. तेच पुढे 11 मार्चपासून दरवाढ झाली नाही. आठवड्याच्या अखेरच्या सत्रात मात्र सोन्या चांदीच्या किंमती परत चढल्या. सोने चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याने सराफा बाजारात ग्राहकांना आता अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. पाहूया, काय आहे सोन्याचांदीची आजची किंमत १६ मार्च २०२४ (Gold Silver Price Today 16 March 2024) –

सोने महागले

मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या दहा दिवसांत सोने 3,430 रुपयांनी महागले. 10-11 मार्च रोजी किंमतीत बदल झाला नाही. 12 मार्चला सोन्याचा भाव किरकोळ कमी झाला. 13 मार्च रोजी सोन्याच्या भावात 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी महागले. आणी काल किंमतीत बदल झाला नाही. गुडरिटर्न्सनुसार, आता 22 कॅरेट सोने 60,750 रुपये प्रति 10 ग्रॅम तर 24 कॅरेट सोन्याचा दर 66,260 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

तुम्हाला नक्की आवडेल 👉 ‘7’ खूपच सुंदर सोन्याच्या अंगठीचे 2024 मधिल ट्रेंडिंग डिझाइन्स.

👉 सोन्याच्या कानातल्यांचे 7 जबरदस्त नवीन डिझाइन 2024, Stunning New Designs of Gold Earrings.

👉 7 अतिशय सुंदर सोन्याचे नेकलेस डिझाइन; सगळे बघतच राहतील.

चांदीची किंमत देखील वाढली

1 मार्च ते 10 मार्च या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी महागली होती. 11 मार्च रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. 12 मार्च रोजी चांदीचे 500 रुपयांनी भाव वाढले. तेच 13 मार्च रोजी चांदीत 900 रुपयांची मोठी घसरण झाली. 14 मार्च रोजी चांदीत 1800 रुपयांची दरवाढ झाली. आणी काल चांदीच्या किंमतीत बदल दिसला नाही. गुडरिटर्न्सनुसार आता एक किलो चांदीचा भाव 77,000 रुपये आहे.

सोन्याचा 14 ते 24 कॅरेटचा दर

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,  सोने आणि चांदी महागले आहे. त्यानुसार 24 कॅरेट सोने 65,559 रुपये, 23 कॅरेट सोने 65,297 रुपये, 22 कॅरेट सोने 60,052 रुपये झाले आहे.18 कॅरेट 49,169 रुपये, 14 कॅरेट सोने 38,352 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. एक किलो चांदीचा भाव 74,210 रुपये इतका झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर, कर नसतो. तर सराफा बाजारात करांचा समावेश होत असल्याने सोन्याच्या किंमतीत बदल दिसून येतो.

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

घरबसल्या जाणून घ्या भाव

सोने-चांदीच्या किंमती आपल्याला घरबसल्या पण जाणून घेता येतील. सोने-चांदीचे नवीनतम भाव अगदी सहजपणे जाणून घेता येतील. त्यात स्थानिक कर तसेच इतर करांचा भर पडतो. त्यामुळे शहरानुसार किंमतीत बदल दिसून येतो. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) हे भाव जाहीर करते. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या सुट्या, शनिवार आणि रविवार हे दिवस सोडून या किंमती जाहीर केल्या जातात. आपण 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊन सर्व कॅरेटचे सोन्याचे आजचे नवीनतम भाव जाणून घेऊ शकता.

हेही वाचा 👉 सांगलीतील आजचा सोन्याचा आणि चांदीचा भाव – 2024-03-16.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम