Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीला ब्रेक, अशी आहे सोन्याचांदीची आजची किंमत १७ मार्च २०२४

3 Min Read
सोने आणि चांदीच्या किंमतींची काय अपडेट

Gold Silver Rate Today 17 March 2024 : मार्च महिना सुरु होताच पाहिले दहा दिवस सोन्या चांदीने मोठी कमाल दाखवली होती, दोनीही धातुंचे दर चांगलेच वाढत चालले होते. पण या आठवड्यात सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीला ब्रेक लागला. 

1 ते 10 मार्च या काळात सोने आणि चांदीने मोठी मजल मारली होती. पण या आठवड्यात दरवाढीच्या सत्राला ब्रेक लागला. या आठवड्यात तीन दिवस सोन्याचे दर उतरले. आणी फक्त एकदाच सोन्याच्या भाव वाढला. इतर दिवशी सोन्याच्या भावात बदल झाला नाही. मात्र चांदीत चढउतार सुरूच होता. अशी आहे सोन्याचांदीची आजची किंमत १७ मार्च २०२४, (Gold Silver Price Today 17 March 2024) –

सोने :

मार्चच्या पहिला दहा दिवसांत सोन्याचा दर 3,430 रुपयांनी वाढला होता.

सध्या ट्रेंडिंग 👉 ह्या अभिनेत्रीने विवस्त्र होऊन साजरी केली होळी, फोटो सोशल मीडियावर व्हायरल.

10 व 11 मार्च रोजी सोन्याच्या किंमती स्थिर होत्या. 12 मार्चला सोन्याचा भाव किरकोळ कमी झाला. 13 मार्चला सोन्याच्या भावात 420 रुपयांची घसरण झाली. 14 मार्च रोजी सोने 250 रुपयांनी महागले. 15 मार्चला किमतीचा काही बदल झाला नाही. आणी काल म्हणजेच शनिवारी सोन्याच्या किंमतीत किरकोळ घट झाली. सध्या गुडरिटर्न्सनुसार, 22 कॅरेट सोने 60,740 रुपये प्रति 10 ग्रॅम आणी 24 कॅरेट सोन्याचा भाव 66,250 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे.

पाहा तुम्हाला नक्की आवडेल 👉 सोन्याच्या कानातल्यांचे 7 जबरदस्त नवीन डिझाइन 2024, Stunning New Designs of Gold Earrings.

👉 Gold Stud Earrings: फक्त 5000 च्या आतले ‘7’ बॉलीवूड स्टाईल डिझाइन्स.

👉 ‘7’ खूपच सुंदर सोन्याच्या अंगठीचे 2024 मधिल ट्रेंडिंग डिझाइन्स.

चांदी :

मार्चच्या सुरुवातीच्या 1 मार्च ते 10 मार्च या दहा दिवसांत चांदी 3 हजार रुपयांनी महागली. 11 मार्च रोजी चांदी 100 रुपयांनी स्वस्त झाली. 12 मार्च रोजी चांदीचे भाव 500 रुपयांनी वाढले. 13 मार्च रोजी चांदीच्या किंमतीत 900 रुपयांची मोठी घसरण दिसून आली. 14 मार्च रोजी चांदीत 1800 रुपयांची मोठी दरवाढ झाली. 15 मार्चला चांदीच्या किंमतीत काही बदल झाला नाही. काल म्हणजेच 16 मार्चला चांदीच्या किंमतीत 300 रुपयांनी दरवाढ दिसून आली. गुडरिटर्न्सनुसार, आता एक किलो चांदीचा भाव 77,300 रुपये आहे.

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

सोन्याचांदीची आजची किंमत १७ मार्च २०२४ :

इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) नुसार,  सोने आणि चांदी महाग झाले आहे. 24 कॅरेट सोने 65,559 रुपये, 23 कॅरेट सोने 65,297 रुपये, 22 कॅरेट सोने 60,052 रुपये आहे.18 कॅरेट सोने 49,169 रुपये, 14 कॅरेट सोने 38,352 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचले आहे. तेच इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार आता एक किलो चांदीचा भाव 74,210 रुपये झाला आहे. वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर नसतो तर सराफा बाजारात कराचा समावेश होत असतो म्हणूनच सोन्याच्या किंमतीत फरक दिसून येतो.

घरबसल्या जाणून घ्या सोन्याचांदीची आजची किंमत

घरबसल्या सोन्याचांदीची आजची किंमत जाणून घेण्यासाठी 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्या आणी सर्व कॅरेटचे आजचे दर जाणून घ्या.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम