Gold Silver Rate Today | सोन्याच्या किंमती बिटकॉईन च्या बरोबरीने वाढण्याचे कारण तरी काय, किती वाढतील अजून भाव

3 Min Read

Gold Silver Rate Today : मार्च महिना सुरु होताच सोन्याच्या किंमती बिटकॉईन च्या किंमती (Bitcoin Price) च्या वेगाने वाढू लागल्या आहेत, 1 मार्च ते 10 मार्चपर्यंत या दहाच दिवसात सोने 3,430 रुपयांनी महाग झाले आहे. तीच परिस्थिती चांदीची पण पाहायला मिळत आहेत. सोने चांदी या दोन्ही धातुंच्या किंमतीत प्रचंड वेगाने वाढ होते आहे.

लेटेस्ट अपडेट 👉 Gold Silver Rate Today : या आठवड्यात सोन्या चांदीच्या वाढत चाललेल्या किमतीला ब्रेक, अशी आहे सोन्याचांदीची आजची किंमत १७ मार्च २०२४.

पाहा, तुम्हाला नक्की आवडेल 👉 ‘7’ खूपच सुंदर सोन्याच्या अंगठीचे 2024 मधिल ट्रेंडिंग डिझाइन्स.

👉 सोन्याच्या कानातल्यांचे 7 जबरदस्त नवीन डिझाइन 2024, Stunning New Designs of Gold Earrings.

👉 7 अतिशय सुंदर सोन्याचे नेकलेस डिझाइन; सगळे बघतच राहतील.

सध्या सोने 65 हजार रुपये ते 66 हजार रुपयांच्या रेंजमध्ये आले आहे, अवघ्या 10 दिवसात सोन्याच्या किंमतीत झपाट्याने वाढ झाल्याचे पाहून सोन्याच्या किंमती अजून किती वाढतील आणी या अचानक होऊ लागलेल्या दरवाढीमागे नेमके कारण तरी काय आहे, भारतात सोन्याचे दर का वाढत आहेत, असे अनेक प्रश्न ग्राहकांना पडले आहेत.

MCX Exchange वर मागच्या शुक्रवारी सोन्याचा वायदा 66,023 रुपये प्रति 10 ग्रॅम या उच्चस्तरावर पोहचला. सोन्याच्या किंमतीत दहा दिवसांत 3,430 रुपयांची वाढ झाली. या सोन्यात आलेल्या अचानक तेजीमुळे सोने खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खिशाला याचे ओझे सहन करावे लागत आहे. या सोन्याच्या दरवाढीमागे अमेरिकन फेडरल रिझर्व्ह ही बँक आहे.

अमेरिकन फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात कपातीचे संकेत दिले आहेत आणी त्यामुळेच जागतिक आणि देशातील बाजारात सोन्याने मुसंडी मारली आहे. अमेरिकन केंद्रीय बँकेचे चेअरमन जेरोम पॉवेल यांनी येत्या महिन्यात युएस फेडद्वारा व्याजदर कपतीचे संकेत दिले आहेत व त्यामुळे बाजाराचा विश्वास वाढला आहे. बुधवारी जागतिक बाजारात सोने 2,152 डॉलर या नवीन उच्चांकावर पोहचले आहे. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी जागतिक बाजारात सोन्याची किंमत 0.25% कमी होऊन 2032.8 डॉलर प्रति औसवर बंद झाली होती.

डॉलर इंडेक्समध्ये मोठी घसरण

सोन्याच्या किंमतीत तेजी आल्याने डॉलर इंडेक्समध्ये मोठी घसरण दिसून आली, डॉलर निर्देशांक पुन्हा 104 या निच्चांकावर पोहचला आहे. यावेळी निर्देशांक 6 प्रमुख चलनाच्या बास्केटच्या तुलनेत 103.80 डॉलरवर आहे. हा स्थिर आहे. पण गेल्या पाच व्यापारी सत्रात डॉलर निर्देशांकात 0.17 टक्के घसरण दिसून आली.

सोन्याचा भाव किती वर जाऊ शकतो 

तज्ज्ञांच्या मते सोन्या चांदीच्या किंमतीतील तेजी कायम राहील. सोन्या चांदीचे मूल्य गगनाला भिडत आहे. इंडियन बुलियन्स अँड ज्वेलर्स असोसिएशननुसार (IBJA), 24 कॅरेट सोने 64,955 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका दर आहे. तर एक किलो चांदीचा दर 72,265 रुपये आहे. तर तज्ज्ञांच्या मते सध्यपरिस्थितीत सोने 72 हजारांचा टप्पा गाठेल तर चांदी प्रति किलो 91 हजार रुपयांपर्यंत मुसंडी मारेल.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम