एसबीआयची नवीन गुंतवणूक योजना | एकदाच गुंतवणूक करून दरमहा कमाई, या योजनेतून दरमहा 25,000 रुपये मिळवण्यासाठी…

2 Min Read
Secure Your Future with SBI Annuity Deposit Scheme

SBI Deposit Scheme : तुम्ही जर गुंतवणूक करून त्यातून दरमहा कमाई करण्यासाठी चांगला मार्ग शोधात असाल तर हा लेख खास तुमच्यासाठी आहे.

भारतातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विविध बचत योजना राबवत असते. स्टेट बँकेच्या अनेक गुंतवणूक योजना आहेत, त्यापैकी एक लोकप्रिय योजना म्हणजे एसबीआई एन्युटी डिपॉजिट स्कीम (SBI Annuity Deposit Scheme) आहे. या योजनेत एकरकमी पैसे गुंतवले की ठराविक कालावधीनंतर आपल्याला दर महिन्याला खात्रीशीर उत्पन्न मिळेल.

किती महिन्यांसाठी डिपॉझिट करू शकता

कोणतीही व्यक्ती एसबीआई एन्युटी डिपॉजिट स्कीमद्वारे 3 वर्षे ते 10 वर्षे डिपॉझिट करून नियमित उत्पन्न मिकवू शकते. या योजनेत आपण 36, 60, 84 किंवा 120 महिन्यांसाठी पैसे जमा करू शकता. ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. या स्कीममध्ये डिपॉझिट करण्यासाठी कमाल ठेवीची मर्यादा नाही. फक्त या योजनेत किमान इतके पैसे जमा करणे आवश्यक आहे की तुम्ही निवडलेल्या कालावधीपर्यंत तुम्हाला दरमहा किमान 1,000 रुपये मिळू शकतील.

कमाल ठेवीवर मर्यादा नाही

ही योजना SBI च्या सर्व शाखांमध्ये उपलब्ध आहे. या योजनेतील व्याजदर बचत खात्यापेक्षा जास्त आहे. यामध्ये कमाल ठेवीची मर्यादा नाही. त्याच वेळी, योजनेत किमान इतके पैसे जमा करणे आवश्यक आहे की तुम्ही निवडलेल्या कालावधीपर्यंत तुम्हाला दरमहा किमान 1,000 रुपये मिळू शकतील.

या योजनेतून तुम्ही दरमहा 25 हजार रुपये कमवू शकता

समजा तुम्ही 7.5 टक्के व्याजाच्या आधारे या योजनेत 10 लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला दरमहा 11,870 रुपये (सुमारे 12 हजार) मिळतील. हे पैसे दर महिन्याला तुम्हाला हप्त्याच्या स्वरूपात परत मिळतील. तुम्हाला या योजनेतून दरमहा 25,000 रुपये मिळवण्यासाठी 21,00,000 रुपये गुंतवावे लागतील.

ओव्हरड्राफ्ट सुविधा उपलब्ध

तुम्हाला SBI अॅन्युइटी डिपॉझिट स्कीममध्ये कर्जाची सुविधा देखील मिळते. आवश्यक असल्यास, खात्यातील शिल्लक रकमेच्या 75% पर्यंत ओव्हरड्राफ्टचा लाभ आपण घेऊ शकता.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम