SBI New Feature : तुमचे (SBI Bank) एसबीआय बँक खाते असो वा नसो, तुम्ही आता एसबीआय बँकेच्या या महत्त्वाच्या सेवांचा लाभ घेऊ शकता…

2 Min Read
SBI New features: Whether you have an SBI Bank account or not you can now avail these important services of the sbi bank

SBI Bank New Feature : तुमचे एसबीआय बँक खाते असो किंवा नसो, तुम्ही आता एसबीआय बँकेच्या या सेवांचा लाभ घेऊ शकता.

देशातील बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया. आतापर्यंत (SBI) च्या YONO अॅपचा वापर फक्त SBI बँकेत खाते असणाऱ्यांसाठीच मर्यादित होता पण SBI ने अलीकडेच YONO अॅपचे नवीन व्हर्जन लाँच केले आहे, ज्याने वापरकर्त्यांसाठी त्यांच्या ऑनलाइन बँकिंग सेवा वाढवल्या आहेत. या अपडेटसह, SBI ने त्यांच्या सर्व खातेधारकांसाठी नवीन आणि वैशिष्ट्येपूर्ण सुविधा आणल्या आहेत. सर्वात उल्लेखनीय सेवा म्हणजे युनिफाइड पेमेंट इंटरफेस (UPI) सेवा, जिच्या वापराने YONO अॅप यूजर्स सहजपणे पैसे हस्तांतरित करू शकतात. आता या YONO अॅपचा लाभ घेण्यासाठी SBI मध्ये खाते असणे आवश्यक नाही. या घोषनेची माहिती देण्यासाठी, SBI ने अधिकृत निवेदन जारी केले आहे.

स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) चे (YONO) योनो अँप कसे वापरायचे :

  • सर्वात आधी Google Play Store किंवा App Store वरून योनो अॅप (YONO APP) डाउनलोड करा.
  • डाऊनलोड झाल्यानंतर अँप Open करा.
  • New To SBI या पर्यायावर क्लिक करा.
  • अॅप वापरण्यासाठी तुम्ही Register Now पर्याय निवडा
  • जर तुम्ही एसबीआयचे खातेधारक नसाल तरच तुम्हाला या पर्यायावर क्लिक करायचं आहे.
  • नोंदणी झाल्यानंतर पुढील स्टेपवर तुम्हाला Register to Make UPI Payments हा पर्याय निवडावा लागेल. जिथं तुमचा मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे.
  • ज्या क्रमांकाशी बँक खातं लिंक आहे, ते निवडा.
  • मोबाईल क्रमांक लिंक करण्यासाठी आता तुम्हाला एक मेसेज येईल. ज्यानंतर तुम्ही UPI ID तयार करण्यासाठी बँकेची निवड करू शकता.
  • तुम्हाला Your registration for SBI Pay has started. If it’s not you, please report it to your bank immediately असा एक मेसेज येईल.
  • इथं तुम्ही SBI UPI बनवणं अपेक्षित असेल. जिथं तुम्हाला एसबीआय तीन UPI आयडी देईल त्यामधून तुम्हाला एकाची निवड करावी लागेल.
  • UPI आयडी निवडल्यानंतर ‘You have successfully created an SBI UPI handle’ असा एक मेसेज तुम्हाला मिळेल.
  • आता 6 अंकी MPIN जनरेट करा आणि आता तुम्ही योने अॅप वापरू शकता.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम