जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर आता भारतात लॉन्च; किंमत बघून विश्वासच बसणार नाही

2 Min Read
World’s Cheapest Electric Scooter

World’s Cheapest Electric Scooter : काही वर्षांपूर्वी इलेक्ट्रिक वाहनांच्या किमती इतक्या होत्या की त्या पाहून इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास इचच्छुक असणाऱ्यांना इलेक्ट्रिक वाहणांच्या बजेटबद्दल काळजी वाटायची, पण आता इलेक्ट्रिक वाहणांच्या किमती देखील कमी झाल्या आहेत आणी वाढत्या पेट्रोलच्या किमतीमुळे Electric Scooter खरेदी करणाऱ्यांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

भारतीय वाहन बाजारपेठेतील इलेक्ट्रिक स्कूटर आणि इलेक्ट्रिक बाईकची वाढती मागणी लक्षात घेता नवनवीन ऑटोमेकर्स त्यांच्या इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारपेठेत लाँच करत आहेत. 

इलेक्ट्रिक स्कूटर उत्पादन कंपन्यांमधील वाढलेल्या स्पर्धेमुळे अनेक कंपन्या कमीत कमी किमतीला जास्तीत जास्त वैशिष्ट्यांसह इलेक्ट्रिक स्कूटर आणी बाईक लॉन्च करत आहेत. अशातच देशातील आघाडीची इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी Detel ने या सेगमेंटमध्ये आपले नवीन मॉडेल लाँच केले आहे.

Detel या प्रसिद्ध स्टार्ट-अप कंपनीने डिटेल इझी प्लस नावाची सर्वांच्या खिश्याला परवडेल अशी इलेक्ट्रिक मोपेड लॉन्च केली आहे.

World’s cheapest electric scooter in india : features 

इझी प्लस ही मेटल मिश्र धातु, पावडर-कोटेड आणि ट्यूबलेस टायर्ससह डिझाइन केलेली इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

Detel Easy Plus इलेक्ट्रिक स्कूटर सोबत दोन चाव्या येतात. एक चावी गाडी स्टार्ट आणि स्टॉप करण्यासाठी आहे तर दुसरी चावी गाडीची सीट कंपार्टमेंट ओपन करण्यासाठी आहे. इथे गाडीची बॅटरी दिली आहे.

Detel Easy Plus इलेक्ट्रिक स्कूटरला पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक सस्पेंशन आणि मागच्या बाजूला स्प्रिंग कॉइलसह हायड्रॉलिक सस्पेंशन आहे.  त्यात एक अंडरबोन फ्रेम आहे.  Detel Easy Plus इलेक्ट्रिक मोपेड ला 16″X2.5″ ट्यूबलेस टायर वापरले गेले आहेत.

तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये स्मार्ट डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर (डिस्प्ले स्क्रीन) देण्यात आला आहे. राइडिंग मोड, डिजिटल स्पीडोमीटर, बॅटरी टक्केवारी यासारखी सर्व आवश्यक माहिती डिस्प्लेवर उपलब्ध होते.

Detel Easy Plus इलेक्ट्रिक स्कूटरवर एक वर्षाची वॉरंटी आणि बॅटरीवर 2 वर्षे किंवा 40000 kms पर्यंतची वॉरंटी उपलब्ध आहे.

World’s Cheapest Electric Scooter Easy Plus Price | Detel इझी प्लस किंमत

Detel Easy Plus इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत सुमारे Rs.41999 आहे. विविध शहरांनुसार किमतीत थोडेफार बदल असू शकतात. या गाडीसाठी तुम्हाला नोंदणी आणि परवान्याची गरज भासणार नाही कारण ही कमी गतीची इलेक्ट्रिक स्कूटर आहे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम