Home Face Pack For Glowing Skin : चमकदार त्वचेसाठी वापरा हे 3 प्रभावी घरगुती फेस पॅक…

2 Min Read
Best homemade face pack for glowing skin in marathi

Best homemade face pack for glowing skin in marathi : पावसाळा सुरु झालाय अणि आत्तापासूनच आपण चेहऱ्याची काळजी घ्यायला सुरु केली पाहिजे.

आपल्यातील सर्वांनाच वाटत असत कि ऋतू कोणताही असो आपला चेहरा नेहमी चमकदार व तजेलदार रहायला हवा. त्वचेचा रंग कोणताही असो तो सुंदर च असतो. पण मैत्रिणींनो प्रदूषणामुळे किंवा उन्हामुळे त्वचेचा नैसर्गिक ग्लो जाऊन त्यावर काळे डाग, पुरळ आल्यामुळे जो निस्तेजपणा येतो तो घालवणे गरजेचं असते.म्हणूनच मी तुम्हाला तीन प्रकारचे घरगुती फेसपॅक सांगणार आहे ते तुम्ही नक्की वापरून बघा.

त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काचेसारखी पारदर्शकता आल्याची अनुभूती तुम्ही घ्याल, तर वापरून बघा हे खाली दिलेले घरगुती फेसपॅक.

चमकदार त्वचेसाठी घरगुती फेस पॅक :

टोमॅटो फेस पॅक :

हा फेसपॅक तुम्ही टोमॅटो वापरून बनवायचा आहे. एका बाउल मध्ये अर्ध्या टोमॅटोची प्युरी घ्या त्यात एक टी स्पून कॉफी अणि एक छोटा स्पून मध घाला. आणि हे सगळं मिश्रण छान हलवून घ्या व हलक्या हाताने चेहऱ्यावर गळ्यावर लावा. 10 मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवून टाका.

बेसन फेस पॅक :

एका बाउल मध्ये एक स्पून बेसन, एक स्पून हळद घ्या त्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घाला. बेसनमध्ये चेहरा उजळ करण्याचे खूप प्रभावी गुणधर्म असतात. तर हळदीत अँटीसेप्टीक गुणधर्म असतात, ज्यामुळे चेहऱ्यावर येणारे पुरळ टाळले जाऊ शकतात. लिंबू हा व्हिटॅमिन क चा उत्तम स्रोत समजला जातो. व्हिटॅमिन क आपल्या स्किन ला छान चमकदार बनवते. हा बेसन फेस पॅक चेहऱ्यावर गळ्यावर लावा. 20 मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा.

दही फेस पॅक :

एका बाउल मध्ये एक स्पून घरात बनवलेलं घट्ट दही घ्या, त्यामध्ये एक स्पून मेथी पावडर घ्या आणि थोडस गुलाबजल घ्या. मेथी पावडरमुळे त्वचेवर आलेल्या सुरकुत्या कमी होण्यास मदत होते तर गुलाबजल मुळे चेहरा ताजेलदार दिसतो. हा दही फेसपॅक चेहऱ्यावर गळ्यावर लावा. 10 मिनिटांनी साध्या पाण्याने चेहरा धुवा.

आठवड्यात तीनदा आलटून पालटून वरील फेसपॅक लावले तर त्याचा खूप छान फायदा तुमच्या स्किनला होईल.

#चमकणारी त्वचा घरगुती फेस पॅक. #चमकदार त्वचेसाठी घरगुती फेस पॅक. #सर्वोत्तम फेस पॅक. #रोजच्या वापरासाठी घरगुती फेस मास्क.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम