Hair Growth Food : केस मजबूत आणी रेशमी बनवण्यासाठी व्हेजिटेरियन आरोग्यदायी आहार: आपल्या आहारात या ६ पदार्थांचा समावेश करा, केस होतील लांब आतून मजबूत आणि सुंदर

2 Min Read
indian vegetarian food for hair growth

Hair Growth Food : आपले केस मजबूत आणी रेशमी असावेत अशी सर्वांचीच इच्छा असते. केसांची बाह्य निगा राखणे महत्वाचे असते त्याचबरोबर आपल्या केसांचे आतून पोषण करणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. आपला दैनंदिन आहार आपल्या केसांच्या आरोग्यावर लक्षणीय परिणाम करत असतो.

1: पालक: लोह, जीवनसत्त्वे अ आणि क आणि फोलेटने युक्त असलेले पालक हे तुमच्या केसांसाठी सुपरफूड आहे. लोहाच्या कमतरतेमुळे केस गळती होऊ शकते, म्हणून पालक खाल्ल्याने आपल्या केसांना मजबुतीसाठी हवी असणारी लोह, अ, क, इत्यादी जीवनसत्त्वे मिळतात म्हणून पालक खाणे केसांसाठी फायदेशीर असते.

2: रताळे: रताळ्यामध्ये बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते, रताळे खाल्ल्याने केस नैसर्गिकरित्या हैडरेट होण्यास मदत होते.

3: सुका मेवा: बदाम,अक्रोड, फ्लेक्ससीड्स आणि चिया बियांमध्ये व्हिटॅमिन ई, ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् आणी जस्त सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.  हे घटक केसांच्या स्कॅल्प चे पोषण करतात, केसांच्या वाढीस मदत करतात तसेच केसातील कोरडेपणा दूर करतात. सकाळच्या नाष्ट्यामध्ये यापैकी एकातरी घटकाचा समावेश करावा.

4: दही : दही हे प्रथिने, व्हिटॅमिन बी 5 आणि व्हिटॅमिन डी चा उत्तम स्रोत आहे. प्रथिने केसांना आतून मजबूत बनवतात, तर व्हिटॅमिन बी 5 केसांची लवचिकता आणि जाडी वाढवण्यास मदत करते. दुपारच्या जेवणामध्ये एक वाटी दह्याचे सेवन करावे.

5: बेरी: स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी आणि रास्पबेरी यांसारख्या बेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात. ज्यामुळे केसांची भरपूर वाढ होण्यास मदत होते.

6: मसूर: मसूर हे प्रथिने, लोह व जस्त युक्त असते. हे केसांच्या वाढीस मदत करते म्हणून रोजच्या आहारात मसूरा चा वापर करावा.

केसांच्या मजबूतीसाठी आणी वाढीसाठी निरोगी आहार अत्यंत आवश्यक असतो. आहारात वरील सहा पदार्थांचा समावेश केल्याने केसांची चांगली वाढ होते, केसगळती थांबते तसेच केसांच्या वाढीसाठी आवश्यक पोषक घटक मिळतात.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम