Methi Paratha: हा खास पदार्थ वापरून बनवा चार दिवस टिकतील असे मेथीचे मऊसूद आणि टेस्टी पराठे

2 Min Read
Try this delicious and healthy Methi Paratha for a nutritious breakfast!

Healthy Breakfast Recipe: सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा मील समजला जातो. त्यामुळे तो हेल्दी असावा असे म्हटले जाते. तुम्हालाही सकाळच्या नाश्त्यात काही हेल्दी खायचे असेल व रोज रोज नाश्त्याला काय बनवावे असा प्रश्न पडला असेल तर नाश्त्याला मेथीचे पराठे नक्कीच बनवा. मेथीचे पराठे तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर यात मेथीची भाजी असूनही मेथीचे पराठे मुलं आवडीने खातात. आणी मेथीचे पराठे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तर चला जाणून घेऊया कसे बनवायचे मेथीचे पराठे.

मेथीचे पराठे बनवण्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती

मेथीचे पराठे बनवण्यासाठी आवश्यक साहित्य:

  • एक मोठी वाटी बारीक चिरलेली मेथीची पाने
  • अर्धी वाटी दही 
  • चवीनुसार मीठ
  • दोन वाटी गव्हाचे पीठ
  • एक वाटी बेसन पीठ 
  • अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर
  • चार हिरव्या मिरच्या, एक चमचा जिरे, 5-6 लसूण पाकळ्या यांच बारीक वाटण 
  • एक छोटा चमचा ओवा
  • दोन छोटे चमचे काश्मिरी लाल तिखट

मेथीचे पराठे बनवण्याची कृती: गव्हाच्या पिठामध्ये वरील सर्व साहित्य मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये आपला खास पदार्थ म्हणजे अर्धी वाटी दही मिसळा. दह्यामुळं आपले पराठे चार दिवस मऊ राहतील. आता थोडे थोडे पाणी टाकत पोळ्यांसाठी मळतो त्या पद्धतीने कणिक मळून घ्यावी. (थोडे थोडे पाणी टाकतच पीठ मळावे). त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट पीठ झाकून ठेवावे. वीस मिनिटांनी त्या कनकेचे मध्यम आकाराचे पराठे लाटून घ्यावेत, तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यावेत. अशा पद्धतीने बनविलेले पराठे पौष्टिक तर होतातच शिवाय मुलंही आवडीने खातात. हे पराठे गोड दह्या बरोबर किंवा टोमॅटो केचप बरोबर सुद्धा खूप टेस्टी लागतात. तर नक्की करून बघा मेथीचे पराठे.

#निरोगी नाश्ता कल्पना. #निरोगी नाश्ता. #मुलांसाठी निरोगी नाश्ता.भारतीय मुलांसाठी नाश्ता कल्पना. #मेथी पराठा रेसिपी. #मेथी पराठा सोपी रेसिपी. #सर्वोत्तम मेथी पराठा रेसिपी.सोपी मेथी पराठा रेसिपी.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम