Paneer Paratha: नाश्त्यासाठी बनवा पनीर पराठा, वापरा आमच्या स्पेशल ट्रिक्स, लहानान पासुन मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील

2 Min Read
Enjoy a delightful paneer paratha for breakfast. Paneer Paratha Recipe in Marathi

लहानान पासुन मोठ्यांपर्यंत सगळेच आवडीने खातील जेव्हा तुम्ही आमच्या स्पेशल ट्रिक्स वापरून बनवाल पनीर पराठे.

गृहिणी नेहमीच आपल्या कुटुंबासाठी चवीला छान, झटपट होणारा आणि त्याचबरोबर पौष्टिक अशा नाश्ष्ट्याच्या पदार्थाच्या शोधात असतात असाच एक पदार्थ आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे पनीर पराठा. पनीर पराठे तर तुम्ही बनवले असतीलच पण खाली दिलेल्या काही महत्वाच्या टिप्स वापरून पनीर पराठे बनवून पहा खूप मऊ व टेस्टी होतात.

पनीर पराठा बनवण्यासाठी लागणारे साहित्य व कृती जाणून घेऊ.

पनीर पराठा बनवण्यासाठी साहित्य

2 वाटी गव्हाचे पीठ,

200gm किसलेले पनीर

1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीरी

1 वाटी बारीक चिरलेला कांदा

एक छोटा चमचा आले हिरवी मिरची व लसनाचे वाटण

अर्धा चमचा ओवा

एक छोटा चमचा जिरे पूड

1 चमचा काश्मिरी लाल तिखट

आवडत असेल तर एक चमचा आमचूर पावडर 

चविप्रमाणे मीठ

पनीर पराठा बनवण्याची कृती

प्रथम आपण पराठ्यांसाठी लागणारे कणिक कसे भिजवावे हे पाहुयात. पराठा कोणताही असुद्या पराठ्यांसाठी कणिक मळताना कणिक खूप घट्ट किंवा पातळ होणार नाही याकडे लक्ष्य द्या. त्यामुळे पराठा लाटताना तो चिकटला जाणार नाही किंवा त्यातील सारण बाहेरही येणार नाही. म्हणून कणिक भिजवताना पिठामध्ये थोडे थोडे पाणी घालत ते मळून घ्यावे त्याचा छान गोळा करून त्याला तेल लावून 15 ते 20 मिनिट सुती कपड्याने झाकून ठेवावे.

आता सारणासाठी गॅसवर भांड ठेवा व त्यामध्ये एक छोटा चमचा तेल घालून गरम कराव. तेल गरम झाल की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा, आलं लसूण मिरचीचे वाटण घालून फक्त 2-3 मिनिट परतून घ्या, (अस केल्याने आल लसनाचा कच्चा वास निघून जाईल). आता गॅस बंद करा आणी उरलेले सर्व जिन्नस त्यामध्ये मिक्स करून मिश्रण एकजीव करून घ्या व त्यात चवीनुसार मीठ घाला. आता पराठे लाटण्यापूर्वी थोडं सारण खाऊन तिखट मिठाच प्रमाण चेक करा आणि आपल्या चवीनुसार अड्जस्ट करून घ्या.

आता मळलेल्या कणकेच्या छोट्या ते मध्यम आकाराच्या पाळ्या करून त्यामध्ये सारण भरून पराठे लाटा. दोन्ही बाजू्नी छान गुलाबी रंगावर शेकून घ्या. हे पराठे गरम गरम बटर सोबत सर्व्ह करा. हे पनीर पराठे खूप टेस्टी लागतात. तर वरील टिप्स वापरून नक्की करून बघा पौष्टिक पनीर पराठे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम