Punjabi Aloo Paratha Recipe In Marathi ; आमच्या स्पेशल टिप्स वापरून बनवा फुग्यासारखे टम्म फुगलेले पंजाबी आलू पराठे

2 Min Read
Learn how to make delicious Punjabi Aloo Paratha with our special tips!

फुग्यासारखे टम्म फुगलेले पंजाबी पद्धतीने आलुचे पराठे बनवण्यासाठी खाली दिलेल्या आमच्या स्पेशल टिप्स वापरून एकदा बघाच

धाब्यावरती जेव्हा आपण आलू पराठे खायला जातो तेव्हा तिथे आपल्याला टम्म फुगलेले, मऊ लुसलुशीत व टेस्टी असे आलू पराठे मिळतात. तसेच पराठे जर घरी बनवता आले तर…!

त्यासाठीच आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत त्या वापरून जेव्हा तुम्ही आलू पराठे बनवाल तेव्हा तुमचा विश्वासच बसणार नाही की इतके छान पराठे तुम्ही घरी बनवलेत.

चला तर मग जाणून घेऊयात ढाबा स्टाईल पंजाबी आलू पराठ्यांसाठी लागणारे साहित्य व कृती.

Punjabi aloo paratha recipe dhaba style

आलू पराठे बनवण्यासाठी साहित्य :

अर्धा किलो बटाटे

दोन मोठ्या वाट्या गव्हाचे पीठ

चार चमचे बेसन पीठ

हिरवी मिरची व दोन चमचे आल्याचे वाटण

दोन मोठे कांदे बारीक चिरून

एक वाटी चिरलेली कोथिंबीर

अर्धा चमचा ओवा

एक चमचा काश्मिरी लाल तिखट

एक चमचा आमचूर पावडर किंवा अनारदाना

चवीप्रमाणे मीठ

आलू पराठे बनवण्याची कृती

प्रथम आपण पराठ्यांसाठीचे कणिक कसे मळावे ते पाहू.

एका मोठ्या भांड्यात गव्हाचे व बेसन पीठ मिक्स करून घ्यावे व त्यात चवीप्रमाणे मीठ घालावे थोडे थोडे पाणी घालत कणिक चांगली मळून घ्यावी. (इथं लक्षात घ्या की कणिक खूप घट्ट किंवा सैल नसावी).

आपली कणिक मुरेपर्यंत सारण करून घ्यावे. सारणासाठी बटाटे शिजवताना खूप जास्त शिजवू नयेत नाहीतर सारण पातळ होईल व पराठे फाटतील. त्यामुळे बटाटे 80% पर्यंत शिजवून घ्यावेत. त्यानंतर बटाटे खिसून घ्यावेत. (इथे बटाटे कुस्कुरून घेण्याऐवजी आपण खिसून घेतलेत असे केल्याने बटाट्यामध्ये गुठल्या राहणार नाहीत व आपल्याला खूप सहजतेने पराठे लाटता येतात).

आता खिसलेल्या बटाट्यामध्ये राहिलेले सर्व साहित्य मिक्स करून घावे. त्या सारनाचे छोटे छोटे गोळे करून कानकीत भरून पराठे लाटून घ्यावेत.

तूप किंवा तेल लावून दोन्ही बाजू्नी लालसर रंग येऊ पर्यंत शेकावेत.

हे पराठे नुसते खाल्ले तरी खूप छान लागतात. पण तुम्ही ते  ढाब्यावर मिळते तशा दह्याच्या चटणी बरोबर देखील खाऊ शकता.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम