सांगली : महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून

1 Min Read
जतमध्ये महाविद्यालयीन तरुणीची गळा आवळून हत्या करण्यात आली

सांगली : जिल्ह्यातील जतमध्ये एका महाविद्यालयीन तरुणीचा गळा आवळून खून झाल्याची हद्यद्रावक घटना सोमवारी सायंकाळी उघढकीस आली असून या खून प्रकरणी एका संशयित तरुणाला पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून संशयित आरोपीचा कसून तपास सुरु आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, खून झालेल्या तरुणीचे नाव अक्षता कोरे असून ती जत मधील आर.आर. महाविद्यालयात कला शाखेच्या प्रथम वर्गात शिक्षण घेत होती.

अक्षता सकाळी कॉलेजसाठी घराबाहेर पडली होती, नेहमीच्यावेळी ती वेळेत घरी न आल्याने कुटुंबियांनी तीचा शोध सुरु केला. दरम्यान राजवाड्याच्या पाठीमागे निर्जन ठिकाणी तरुणीचा मृतदेह पडला असल्याचे समजले. पाहणी केली असता बेपत्ता अक्षताचा खून झाला असल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी घटनास्थळी मिळालेल्या ओळखपत्राच्या आधारे जत पोलिसांनी संशयित निखिल नामदेव कांबळे (१९, रा. शिवाजी पेठ, जत) याला ताब्यात घेतले व त्याची कसून चौकशी सुरू आहे. खुनाची घटना दुपारी बारा ते दीड वाजण्याच्या सुमारास घडली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. पंचनाम्यानंतर अक्षताचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. प्राथमिक तपासात प्रेमप्रकरणातून अक्षताचा खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

घडलेला खुनाचा प्रकार उघडकीस येताच जत पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला तसेच श्वान पथक, ठसे तज्ज्ञ व फॉरेन्सिक लॅबचे कर्मचारी देखील तातडीने दाखल झाले. अप्पर पोलिस अधीक्षक रितू खोकर यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम