Sangli News : दहा वर्षांपासून पत्नीसह फरार असलेल्या अभियंत्याकडे कोट्यावधीची संपत्ती

2 Min Read

Sangli News : दहा वर्षांपासून पत्नीसह फरार असलेल्या जिल्हा परिषदेच्या छोटे पाटबंधारे विभागातील अभियंता राहूल खाडे यांने भ्रष्टाचार करुन कोटीहून अधिक मालमत्ता भ्रष्ट मार्गाने कमविली असल्याचे लाचलुचपत विभागाच्या चौकशीत समोर आले आहे. याप्रकरणी अभियंता खाडेसह पत्नी आणी मुलीविरुध्द विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे उप अधिक्षक संदीप पाटील यांच्याकडून समजले.

अभियंता खाडे हा छोटे पाटबंधारे विभाग, जिल्हा परिषद सांगली येथे शाखा अभियंता म्हणून कार्यरत आहे. कार्यरत असताना खाडेनी भ्रष्ट मार्गाने अपसंपदा कमवली असल्या बाबतच्या तक्रारीचा अर्ज लाचलुचपत विभागाच्या कार्यालयास प्राप्त झाला होता.

त्या अर्जाच्या अनुषंगाने खाडे यांच्या मालमत्तेची उघड चौकशी करण्यात आली असता यामध्ये अभियंता खाडे, पत्नी सरोजिनी खाडे तसेच मुलगी विशाखा खाडे यांनी दि.७.११.१९८९ ते दि.२८.२.२०१५ या परिक्षण कालावधीत ज्ञात उत्पन्न स्त्रोतापेक्षा अधिक ९३ टक्के म्हणजे १ कोटी, २ लाख, ११३ इतकी अपसंपदा भ्रष्ट मार्गाने धारण केली असल्याचे उघड झाले. खाडे यांनी भ्रष्ट व गैर मार्गाने कमवलेली अपसंपदा धारण करण्यास त्यांची पत्नी व मुलीने अपप्रेरणा दिली असल्याचे चौकशी अंती निष्पन्न झाल्याने तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान खाडे व पत्नीविरोधी यापुर्वी जुलै २०१० मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्या गुन्ह्यात जामीनावर मुक्त झाल्यापासून पती-पत्नी दोघेही दहा वर्षापासून फरार आहेत.

ताजी बातमी : Sangli News : रिलेशनशीपसाठी महाविद्यालयीन तरूणीला कॅफेमध्ये बोलवून जबरदस्ती; तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम