Sangli News : मंदिरात केली जिवंत नागाची पूजा, पुजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

1 Min Read
A case has been filed against the priest for worshipping a live snake in the temple

Sangli News : वाळवा तालुक्यातील ढवळी येथील बाळूमामा मंदिरात चक्क जिवंत नागाची पूजा करण्यात येत असल्याची माहिती मिळताच वन विभागाने त्यावर तातडीने हालचाली करत नाग पूजा करणाऱ्या पुजार्‍यासह नागला ताब्यात घेतले. न्यायालयाच्या आदेशाने नागाची नैसर्गिक अधिवासात मुक्तता करण्यात आल्याचे वनक्षेत्रपाल एकनाथ पारधी यांच्याकडून समजले.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की वाळवा तालुक्यातील ढवळी येथील बाळूमामा मंदिरात पुजारी जितेंद्र उर्फ विशाल बबन पाटील हा जिवंत नागाची पूजा करत असल्याची माहिती वन विभागाला मिळाली वन विभागाच्या पथकाने तात्काळ मंदिराकडे धाव घेतली असता नागपूजा करत असलेला पुजारी पाटील हा नाग घेउन मंदिरातून बाहेर गेल्याचे पथकास समजले. वन कर्मचार्‍यांनी तातडीने ढवळी ते भडकंबे मार्गावर पुजारी पाटील याला गाठून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे जिवंत नाग आढळून आला. पथकने त्याला जिवंत नागासह ताब्यात घेतले.

संशयित पाटील याच्यावर वन गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून पुन्हा असा प्रकार करणार नाही असे हमीपत्र घेउन त्याला मुक्त करण्यात आले. तसेच नाग हा अधिसूचित प्राणी असल्याने त्यास न्यायालयात हजर करून न्यायालयाच्या आदेशाने त्यांची वैद्यकीय करण्यात आली व नंतर त्याला नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम