डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील; आज करणार शिवसेना प्रवेश…

1 Min Read
Chandrahar Patil will enter Shiv Sena today

सांगली : डबल महाराष्ट्र केसरी असणारे पैलवान चंद्रहार पाटील आज शिवसेना (उबाठा) पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांनी जय्यत तयारी केली आहे.

सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाला महाविकास आघाडीतून दिली जाणार असल्याचे बोलले जात आहे. अशात काँग्रेसकडून विशाल पाटील हेच उमेदवार पाहिजेत असा देखील जोर धरला जातोय. काँग्रेसचे नेते आमदार डॉ. विश्‍वजित कदम यांनी देखील सांगलीत कोणत्याही परीस्थितीत काँग्रेसच निवडणूक लढविणार आणि विशाल पाटील हेच उमेदवार असतील असा विश्‍वास व्यक्त केला आहे.

पै चंद्रहार पाटील गेल्या एक वर्षापासून लोकसभेच्या निवडणुकीची तयारी करत असून या निमित्ताने त्यांनी सहाही विधानसभा मतदार संघामध्ये बैलगाडी शर्यती, कुस्ती स्पर्धा आणि रक्तदान शिबीराच्या माध्यमातून संपर्क वाढवला आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडूनही उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. मात्र, गेल्या आठवड्यापासून सांगलीची जागा शिवसेना लढविणार असल्याची चर्चा वाढताच ते शिवसेनेच्या संपर्कात होते. आज ते मातोश्रीवर जाऊन शिवबंधन हाती बांधणार आहेत.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानगुडे, अनिल देसाई, संजय राउत ही सेनेची दिग्गज नेते उपस्थित असणार आहेत. त्यांच्यासमवेत सांगलीतून शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय विभुते, बजरंग पाटील यांच्यासह सुमारे तीनशे कार्यकर्ते आज मुंबईला रवाना झाले आहेत.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम