Sangli News : विशाल पाटील हेच उमेदवार आणि तेच पुढचे खासदार नाहीतर विरोधकांना साथ – आमदार विक्रम सावंत

2 Min Read
Congress MLA Vikram Sawant Asserts Support for Vishal Patil as Candidate Amid Party Elections

Sangli News : काँग्रेस भवनमध्ये काँग्रेसच्या नूतन कार्यकारणीच्या निवडीसाठी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. ते म्हणाले महाविकास आघाडीतून सांगलीची जागा ही काँग्रेस पक्षालाच मिळणार आहे आणि काँग्रेसकडून विशाल पाटील हेच आमचे उमेदवार आणि तेच पुढचे खासदार असतील. आणी जर ही जागा काँग्रेसकडून सोडली किंवा उमेदवारी डावलण्याचा प्रयत्न करण्यात आला तर मग सन 2009 ला जत विधानसभेत जो पॅटर्न राबवला होता तोच पॅटर्न सांगली लोकसभेत रबावण्यात येईल, म्हणजेच बंड करून विरोधकांना साथ देण्याचा इशारा काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष, आमदार विक्रम सावंत यांनी पत्रकार बैठकीत दिला.

सावंत म्हणाले पदाधिकारी निवडीसाठी झालेल्या बैठकीत लोकसभा ताकदीने लढवण्याचा निर्णय झाला आहे. आम्ही नवीन सहा उपाध्यक्ष, चार सरचिटणीस व एका सदस्याची निवड केली. पक्ष बांधणी मजबूत होत आहे. आम्ही सांगली पुन्हा जिंकण्याच्या इराद्याने तयारी केली आहे. विशाल पाटील हे आमचे उमेदवार असतील 2019 ची पुनरवृत्ती होऊ नये असे एकमुखी प्रदेश कार्यकारणीला कळवले आहे.

सांगली हा काँग्रेसच्या हक्काचा मतदार संघ असून तो कधीच सोडणार नाही, असे आम्ही स्पष्ट सांगितले आहे आणी ती वेळच येणार नसल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि विधीमंडळ गटतेने बाळासाहेब थोरात यांनी आम्हाला आश्वस्त केले आहे असे ते म्हणाले.

काँग्रेसचे नूतन पदाधिकारी

वरिष्ठ उपाध्यक्ष – प्रा.सिकंदर जमादार (कसबे डिग्रज), उपाध्यक्ष आनंदराव रासकर (कडेगाव), संदीप जाधव (येलूर), संभाजी पाटील (बेडग), नंदकुमार शेळके (वाळवा), शिवाजी मोहिते (हरिपूर), खजिनदार – सुभाष खोत (कानडवाडी), सरचिटणीस – मिलिंद डाके, अण्णाराव पाटील (सनमडी), सदाशिव खाडे (कवलापूर), सदस्य – शेखर तवटे (एरंडोली).

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम