Sangli News : आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ सुरू केला आहे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

2 Min Read
Eknath Shinde Criticizes Uddhav Thackeray at Islampur Gathering in Sangli

Islampur Sangli News – इस्लामपूरमध्ये ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता या मेळाव्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमास मंत्री शंभूराज देसाई, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, खा. धैर्यशील माने, आ. सुधीर गाडगीळ, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, भाजपचे जिल्हाध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील, जनसुराज्यचे प्रदेशाध्यक्ष समित कदम व ईतर मान्यवर उपस्थित होतेे.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री ठाकरे आणि महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, की उद्योगपतीच्या घराखाली बॉम्ब ठेवून उद्योग पळाले असे म्हणणाऱ्यांपेक्षा उद्योगांना विश्वास देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे. यामुळे गेल्या दोन वर्षांत पाच लाख कोटी गुंतवणुकीचे करार झाले आहेत. आमचे सरकार गतिमान असून, लोकांच्या दारात जाऊन त्यांना योजनांचा लाभ देत आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील सरकार यांचे डबल इंजिन सरकार असल्याने सामान्य जनतेला दुप्पट लाभ देण्याचा प्रयत्न करत आहे. आतापर्यंत गेल्या पन्नास-साठ वर्षांत जेवढे काम झाले नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त काम मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात झाले असून, भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही. त्याचबरोबर भारताला जगात मानसन्मान मिळवून देत असताना जागतिक पातळीवर देशाची भक्कम अर्थव्यवस्था निर्माण केली आहे.

एकनाथ शिंदे म्हणाले की विरोधकांच्या पायाखालची वाळू घसरली असून हे चोरले, ते चोरले असे रडगाणे आता सुरू झाले आहे. पण आम्ही असल्या आरोपाला आपल्या कामातून उत्तर देत आहोत. शिंदे म्हणाले माझ्यासाठी सीएम म्हणजे सामान्य माणूस. हीच काही लोकांसाठी पोटदुखी ठरली आहे. यासाठी आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ‘आपला दवाखाना’ सुरू केला आहे. घरी बसून काम होत नसते कामासाठी रस्त्यावर उतरायला लागते, लोकांचे प्रश्न समजून घ्यायला लागतात, तरच त्यांची सोडवणूक तळमळीने करता येते अशा शब्दांत त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांचे प्रत्यक्ष नाव ना घेता टीका केली.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम