चित्रपट पाहण्यासाठी गेलेले चार मित्र अपघातात जखमी, उपचारानंतर दुचाकी घ्यायला परत गेले; पाहतात तर काय…

1 Min Read
Friends Injured in Sangli Multiplex Accident Bike Stolen Upon Return

Sangli News : सांगलीत बायपास रस्त्यावर घाटगे रुग्णालय ते पट्टणशेट्टी दुचाकी शोरुमदरम्यान २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास संजय अजित दावणे यांचा अपघात झाला होता ते मित्र नागेश शिंदे, पिंटू सुरेश ऐवळे व लखन वायदंडे यांच्यासमवेत मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात चित्रपट पाहण्यासाठी गेले होते.

पण चित्रपटाचे तिकीट न मिळाल्याने ते चौघे दुचाकीवरुन (एमएच १० सीजे ५८९२) परत येत होते. त्यावेळी त्यांचा दुचाकी घसरुन अपघात झाला. अपघातात चौघेही जखमी झाले त्यांना १०८ रुग्णवाहिकेतून सांगली शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अपघातग्रस्त दुचाकी घटनास्थळावरच पडली होती नंतर थोड्या वेळाने संजय दावणे व पिंटू ऐवळे यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते दुचाकी ताब्यात घेण्यासाठी घटनास्थळी गेले पण तेथे त्यांना त्यांची गाडी दिसून आली आली नाही.

गाडी तिथे नसल्याचे पाहून त्यांनी जवळपास सर्वत्र शोध घेतला पण तरी देखील त्यांना गाडी सापडली नाही. बेवारस पडलेली दुचाकी चोरट्यांनी लंपास केली होती. याप्रकरणी संजय अजित दावणे (वय २१, रा. १०० फुटी रस्ता, इंदिरानगर झोपडपट्टी, सांगली) यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम