Sangli News : द्राक्ष, बेदाणा महोत्सवामुळे शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध – विवेक कुंभार

1 Min Read
Grape, Currant Festival in Sangli provides rightful market to farmers - Vivek Kumhar

सांगली : सांगली मधील कच्छी जैन भवनमध्ये कृषी विभाग, द्राक्ष संघ, कृषी निविष्ठा उत्पादक कंपन्या, बेदाणा व्यापारी असोसिएशन व बाजार समितीतर्फे महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्ताने द्राक्ष व बेदाणा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांच्या हस्ते या द्राक्ष व बेदाणा महोत्सवाचे उद्घाटन झाले.

उद्घाटन प्रसंगी यावेळी कृषी उपसंचालिका प्रियंका भोसले, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी धनाजी पाटील, जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी स्वप्निल माने, द्राक्ष बागायतदार संघाचे विभागीय अध्यक्ष संजय बरगाले, विज्ञान समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लांडगे, तसेच बेदाणा व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पादनात चांगली वाढ केली आहे. ग्राहकांना द्राक्षाचे महत्त्व सांगणे गरजेचे आहे. त्यासाठी द्राक्ष संघ द्राक्ष उत्पादक शेतकरी यांनी पुढाकार घेतला पाहिजे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार म्हणाले. या महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाला असून दरवर्षी महाशिवरात्री द्राक्ष दिन दिनानिमित्त हा महोत्सव आयोजित केला जाणार आहे.

द्राक्ष व बेदाणा महोत्सवात ब्लॅक क्वीन बेरी, फ्लेम सिडलेस, आरके, ज्योती सिडलेस, थॉमसन, आरा ३५, एसएसएन, सुपर सोनाका, अशा विविध वाणांची द्राक्ष शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणली होती.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम