सांगली : कालच्या हळद सौद्यात कर्नाटकातील शेतकऱ्याला मिळाला विक्रमी भाव; हळदीचा सरासरी दर झाला ‘इतका’

2 Min Read
In yesterdays turmeric deal the farmer in Karnataka got a record price

सांगली : सांगलीची हळद आणि हळद बाजार संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे त्यामुळेच सांगलीत हळदीच्या व्यापारासाठी वेग वेगळ्या प्रांतातून व्यापारी येत असतात. हंगामा सुरु झाल्यापासूनच हळदीला चांगला भाव मिळत आहे. सोमवारी झालेल्या सौद्यामध्ये कर्नाटकातील पामलदणी (ता. गोकाक) येथील शेतकरी कलाप्पा दबाज यांची हळद राजेंद्र बाळगोंड पाटील अडत दुकानात मनाली ट्रेडर्सने क्विंंटलला ५१ हजार रुपये या दराने खरेदी केली. झालेल्या सौद्यामध्ये कमाल दर ५१ हजार तर किमान १७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला. हळदीला सरासरी ३४ हजार २५० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला.

हेही वाचा 👉 संध्याकाळ होताच अचानक उतरले सोन्याचे दर, कमी झालेला नवीन दर येथे चेक करा.

गेल्या आठवड्यात झालेला सर्वोच्च दराचा विक्रम मोडून सोमवारी पुन्हा हळदीच्या दराने तेजी घेत क्विंटलला ५१ हजारांचा दर गाठला असून सरासरी दरानेही ३४ हजार २५० चा टप्पा गाठला आहे.

हेही वाचा 👉 घरबसल्या सोप्या पद्धतींनी खरे आणि बनावट सोने ओळखा; पुढच्या दोनच मिनिटात कळेल आपले सोने खरे आहे की खोटे.

तेच गेल्या आठवड्यात बाजार सुरू झालेल्या दिवशी झालेल्या सौद्यामध्ये हळदीला ४१ हजार १०१ हा सर्वोच्च भाव मिळाला होता. तेव्हा हळदीचा प्रति क्विंटल सरासरी दर २७ हजार रुपये होता. सोमवारी झालेल्या सौद्यामध्ये हळदीला सर्वोच्च दर मिळाला त्याचबरोबर सांगली बाजारात हळदीचा सरासरी दर ३४ हजार २५० रुपये इतका झाला आहे.

आतापर्यंत सांगली बाजारात ९ लाख ५६ हजार २३८ क्विंटल हळदीची आवक झालेली आहे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम