भाजपने मिरज व जतसह राज्यातील ‘इतक्या’ जागा जनसुराज्यला दिल्याच पाहिजेत – आ. विनय कोरे

1 Min Read

सांगली : मिरजेत सोमवारी रात्री जनसुराज्य शक्ती पक्षाचा युवा संवाद मेळावा झाला. आ. विनय कोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस, राष्ट्रवादी व वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष समित कदम, विजयसिंह माने, प्रदिप देशमुख, प्रदिप पाटील, काकासो चव्हाण, संजय माने, प्रकाश माने, प्रविण जाधव, ए. बी. पाटील आदींची प्रमुख उपस्थित होती.

यावेळी बोलत असताना आ. कोरे म्हणाले, देशात राष्ट्रीय विचाराचे सरकार यावे या भूमिकेतून जनसुराज्य शक्ती पक्ष आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडेल पण राज्यात भाजपाने मित्रत्वाची भूमिका कायम ठेवली पाहिजे. राज्यात मिरज, जत आणि सोलापूर, कोल्हापूर, नाशिक आणि मराठवाडा मतदार संघातील जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला मिळाल्याच पाहिजेत अशी आमची मागणी आहे.

भाजपने मिरज व जतसह राज्यातील सात जागा जनसुराज्य शक्ती पक्षाला सन्मानाने द्याव्यात असे आवाहन पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष आ. विनय कोरे यांनी मिरजेत मेळाव्यादरम्यान बोलताना केले.

स्वागत प्रास्तविकात प्रदेशाध्यक्ष श्री. समित कदम म्हणाले विनयजी कोरे यांनी पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या संघर्षातून पक्ष उभा केला. पक्षाने विधानसभेत जनतेचे प्रश्न सोडवले म्हणून पक्ष वाढला. पक्षाने मराठा आरक्षणाचे समर्थन करत असताना लिंगायत समाजाच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. यामुळे मराठा समाजाला १० टक्के आरक्षण व लिंगायत समाजासाठी महामंडळाची घोषणा झाली असे त्यांनी सांगितले.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम