Sangli News : रिलेशनशीपसाठी महाविद्यालयीन तरूणीला कॅफेमध्ये बोलवून जबरदस्ती; तरूणीचा आत्महत्येचा प्रयत्न

2 Min Read
Sangli College Girl Attempts Suicide Amid Forced Relationship

Sangli News : रिलेशनशीपसाठी महाविद्यालयीन तरूणीला कॅफेमध्ये बोलवून तिच्यावर रिलेशनशीपसाठी जबरदस्ती केल्यामुळे तरूणीने किटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच घडल्याने खळबळ उडाली असून संशयित सारंग कांबळे (वय २२, रा. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिडित तरूणीने याबाबत फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की मिरज तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे. गेल्या काही दिवसापासून संशयित सारंग तिच्या मागावर होता. दोन दिवसापूर्वी पीडित तरुणी महाविद्यालयातून बाहेर पडताच तिला संशयित दिसला. ती त्याला टाळण्यासाठी आतमध्ये गेली असताच संशयित सारंग याने पीडितेस अनोळखी मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधला आणी ‘तू बाहेर आली नाहीस तर तुझ्या घरापर्यंत मागे येईन’ असे धमकावले. त्याच्या धमकीला घाबरूम ती घाबरून बाहेर आली.

हेही वाचा 👉 सांगलीच्या पट्ठ्यान जोर मारण्याच्या स्पर्धेत केला विक्रम; दहा मिनिटात ३१० जोर मारून पटकवला प्रथम क्रमांक.

ती बाहेर आल्यानंतर त्याने तिला एका कॅफे मध्ये न्हेलं आणी तिच्यासमोर रिलेशनशीपचा प्रस्ताव ठेवला आणी कॅफेमध्ये तिच्याशी जबरदस्ती करू लागला. पीडितेने नकार दिल्याने त्याने तिला तब्बल दोन तास कॅफेमध्येच थांबवून ठेवले. घडलेल्या प्रकारामुळे पीडिता घाबरली. आणी तिथून घरी जातानाच पीडितेने किटकनाशक घेतले आणी घरी गेल्यानंतर तिने ते कीटकनाशक पाण्यात मिसळून आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिचे कुटुंबिय घाबरले. घरच्यांनी तिला धीर देऊन समजावले. त्यानंतर त्या तरुणीने सांगली ग्रामीण पोलिसांत संशयित सारंगविरुद्ध फिर्याद दिली पीडितेने दिलेल्या फिर्यादीनुसार सारंगविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम