Sangli News: जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता महिंद्रा थार सह ‘या’ 31 नव्या वाहनांचा समावेश

2 Min Read
32 new vehicles have now been added to the fleet of Sangli District Police Force

सांगली : जिल्हा पोलीस दलाच्या ताफ्यात आता नव्याने 32 वाहनांचा समावेश झाला आहे. यामध्ये 1 महिंद्रा थार, 12 महिंद्रा बोलेरो 8 फोर्स ट्रॅव्हलर 1 डॉग व्हॅन आणि 10 अत्याधुनिक मोटरसायकलिंचा समावेश आहे. गुरुवारी 7 फेब्रुवारी रोजी पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते या वाहनांचा लोकार्पण सोहळा पोलीस मुख्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.

सांगली जिल्हा पोलीस वाहन ताफ्यात वाहनांची संख्या कमी असून सांगली जिल्ह्यातील विविध धार्मिक सण उत्सव, कायदा आणि सुव्यवस्था हाताळणी, व्हीआयपी, व्ही व्हीआयपी दौरा बंदोबस्त आणि निवडणूक बंदोबस्तामध्ये वाहनांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्याकरता नवीन वाहनांची अत्यंत आवश्यकता असलेने सन 2023 आणि 24 च्या जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून 2 कोटी 62 लाख 48 हजार 669 रुपये इतक्या किमतीची एकूण 22 वाहने खरेदी करण्यात आलेली आहेत.

सन 2018-19 च्या निकामी झालेल्या दुचाकी वाहनांच्या बदली दहा दुचाकी वाहने पोलीस महासंचालक कार्यालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडून सांगली जिल्हा पोलीस दलास प्राप्त झाली आहेत.

ही नवी वाहने अपात्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना मदत करण्यास अत्यंत उपयोगी ठरणार असून कायदा आणि सुव्यवस्था राखणे तसेच सर्वसामान्य नागरिकांची सुरक्षा इत्यादी करता उपयुक्त ठरणार आहेत.

हा नवीन वाहनांचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते सायंकाळी सहा वाजता संपन्न झाला. सदर कार्यक्रमास पोलीस अधीक्षक, सांगली श्री.  संदिप बी घुगे, खासदार संजय काका पाटील, आमदार सुधीर दादा गाडगीळ, आमदार अरुण लाड, आमदार श्रीमती सुमनताई पाटील, आमदार मानसिंग नाईक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी डॉ.राजा दयानिधी यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम