Sangli News : रेल्वे प्रशासनाने डेमू व पॅसेंजरच्या तिकीट दरात केली ५८ टक्क्यांपर्यंत घट, नवीन मासिक पासचे दर जाणून घ्या

1 Min Read
Sangli Big Breaking News Railway Administration has reduced the ticket price of Demu and Passenger by up to 58 percent, know the price of new monthly pass

Sangli News : रेल्वे प्रशासनाने डेमू आणि पॅसेंजर प्रवास्यांना मोठा दिलासा दिला आहे. रेल्वे प्रशासनाकडून ४२ ते ५८ टक्क्यांपर्यंत तिकीट दरात घट करण्यात आल्याने मासिक व त्रैमासिक पासचे दरही आता कमी झाले आहेत. रेल्वे बोर्डाने कोरोनापूर्व काळातील पॅसेंजर व डेमू गाड्यांच्या तिकिटांचे दर आता लागू केले आहेत. त्यामुळे स्थानिक स्तरावर तिकीट दर कमी झाले आहेत आणि यामुळे रेल्वे प्रवाशांचा आर्थिक भार कमी होणार आहे.

मासिक पासचे दर:

सांगली ते कोल्हापूर: २७० रुपये (मासिक) ७३० रुपये (त्रैमासिक)

सांगली ते बेळगाव: ५२५ रुपये (मासिक) १४२० रुपये (त्रैमासिक)

सांगली ते सातारा: ४४० रुपये (मासिक) ११९० रुपये (त्रैमासिक)

सांगली ते कराड: २७० रुपये (मासिक) ७३० रुपये (त्रैमासिक)

सांगली ते कुडची: १८५ रुपये (मासिक) ५०० रुपये (त्रैमासिक)

सांगली ते घटप्रभा: ३५५ रुपये (मासिक) ९६० रुपये (त्रैमासिक)

सांगली ते क. महांकाळ: २७० रुपये (मासिक) ७३० रुपये (त्रैमासिक)

तसेच सांगलीतून आरग, बेळंकी, सलगरे, विजयनगर, शेडबाळ, कुडची या गावांना पॅसेंजरचा तिकीट दर १० रुपये केला असून चिंचली, रायबाग, कवठेमहांकाळ, जत या मार्गावरील तिकीट दर १५ रुपये करण्यात आला आहे. त्याच बरोबर सांगलीतून धारवाड, हुबळी व सोलापूरला आता फक्त ५५ रुपयांत जाता येईल. एक्स्प्रेस गाड्यांचे पूर्वीचे दर कायम ठेवण्यात आले आहेत.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम