Sangli News : परीक्षा शुल्कासाठी बोर्डाने मिरजेतील ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल अडविला

2 Min Read
sangli news 29 february 2024

Sangli News : Miraj – सांगली महापालिकेच्या मिरज हायस्कूलमध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असणाऱ्या देवेश लक्ष्मण नलवडे याने २५ हजार रुपये परीक्षा शुल्काचा अपहार केल्याप्रकरणी उपायुक्त स्मृती पाटील यांनी त्यास बुधवारी निलंबित केले. तसेच देवेश नलवडे यांच्या विरुद्ध मिरज शहर पोलिसांत तक्रार देखील देण्यात आली आहे. पण बोर्डाला परीक्षा शुल्क मिळाले नसल्याने बोर्डाने ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल अडविला आहे.

४ ते ६ ऑक्टोबर २०२३ रोजी राज्य कला संचालनालयातर्फे मिरज हायस्कूलमध्ये चित्रकला स्पर्धा घेतली गेली होती. नववी व दहावीचे विद्यार्थी या परीक्षेस बसतात. दहावीच्या विद्यार्थ्यांना या परीक्षेचे ७ गुण दहावी बोर्ड परीक्षेत दिले जातात. ऑक्टोबर २०२३ च्या परीक्षेसाठी मिरज शहर व तालुक्यातील २६ शाळांमधील ६९५ विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. परीक्षेस बसलेल्या सर्व ६९५ विद्यार्थ्यांनी प्रत्येकी १०० रुपयांप्रमाणे परीक्षा शुल्क आपापल्या शाळेमध्ये जमा केले होते. मिरज हायस्कूलमध्ये परीक्षा केंद्र असल्याने सर्व शाळांनी हे परीक्षा शुल्क मिरज हायस्कूलमध्ये जमा केले होते. मात्र ६९५ विद्यार्थ्यांपैकी ३५८ विद्यार्थ्यांचे प्रत्येकी ७० रुपयांप्रमाणे एकूण २५ हजार ६० रुपये ही रक्कम जमा झाली होती पण लिपिक देवेश नलवडे याने जमा झालेली रक्कम बोर्डाकडेही जमा केली नाही. यामुळे दहावी बोर्डाने या ३५८ विद्यार्थ्यांचे परीक्षेचे रिसीट पाठविले नाही. त्यानंतर लिपिक देवेश नलवडे याने मुख्याध्यापक यांचे लेटरहेड व शिक्का वापरून त्यावर मुख्याध्यापकांची खोटी सही करून परीक्षा बोर्डाशी बोगस पत्रव्यवहार केला व या विद्यार्थ्यांना विनारिसीट परीक्षेस बसविण्यात आले. १ फेब्रुवारी रोजी परीक्षेचा निकाल लागल्यानंतर परीक्षा शुल्क जमा नसल्याने त्या ३५८ विद्यार्थ्यांचा निकाल मिळाला नसल्या कारणाने शाळेने याबाबत परीक्षा बोर्डाशी पत्रव्यवहार केल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला.

घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून महापालिका आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशाने उपायुक्त स्मृती पाटील यांनी लिपिक देवेश नलवडे यास निलंबित केले तसेच देवेश नलवडे याच्यावर फौजदारी कारवाईसाठी मिरज पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी आणखी काही जणांची चौकशी होणार असून, यातील दोषींवर फौजदारी कारवाई केली जाईल असे उपायुक्त स्मृती पाटील यांनी सांगितले.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम