महानगरपालिका क्षेत्रात पाणी बिलाची आकारणी दुप्पट दराने; आता ‘या’ नळ कनेक्शन धारकांना मोजावे लागणार दुप्पट पैसे

1 Min Read
The municipal corporation will charge the water bill at double rate to the holders of these tap connections

Smkc today news | सांगली : सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेकडून 5 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या आवाहन पत्रकात असे आवाहन करण्यात आले आहे की महानगरपालिका क्षेत्रात ज्या नळ कनेक्शन धारकांचे पाणी मीटर बंद स्थितीत असेल त्यांनी स्वखर्चाने आपले पाणी मीटर दुरुस्त करून घ्यावे किंवा मान्यताप्राप्त कंपनीचेच पाणी मीटर महानगरपालिकेकडून प्रमाणित करून बसवून घ्यावे.

आपल्यासाठी खास 👉 सांगली लोकसभेची जागा कुणाला मिळाली पाहिजे – आपल मत नोंदवा,.

महानगरपालिका क्षेत्राच्या हद्दीतील ज्या नळ कनेक्शन धारकांचे पाणी मीटर एक महिण्यापेक्षा जास्त काळ नादुरुस्त असेल अशा नळ कनेक्शन धारकांना पाणी मीटर सुस्थितीत आणे पर्यंत दुप्पट दराने बिलाची आकारणी करण्यात येणार असल्याचे जाहीर आवाहन यापूर्वीच दि 22/11/2023 रोजीच्या दैनिक सकाळ आणी प्रतिध्वनी या वृत्तपत्रात प्रसिद्ध करण्यात आले होते.

तरीदेखील ज्या नळ कनेक्शन धारकांनी आपले बंद असलेले पाणी मीटर अद्याप दुरुस्त करून किंवा बदलून सुस्थितीत आणले नसेल अशा नळ कनेक्शन धारकांनी आपले पाणी मीटर दि 30/04/2024 पर्यंत सुस्थितीत आणावे. अन्यथा त्यांच्या पाणी बिलाची आकारणी दुप्पट दराने करण्यात येणार आहे. बंद असणारे पाणी मीटर सुस्थितीत आणण्याची शेवटची तारीख 30/04/2024 आहे, त्यानंतर मात्र पाणी बिलाची आकारणी दुप्पट दरानेच केली जाईल.

महानगरपालिकेकडून असे आवाहन करण्यात आले असून याची सर्वांनी नोंदी घ्यावी.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम