Sangli News : सांगलीच्या पट्ठ्यान जोर मारण्याच्या स्पर्धेत केला विक्रम; दहा मिनिटात ३१० जोर मारून पटकवला प्रथम क्रमांक

1 Min Read
Thrusting competition was held in Sangli shubham chavan from sangli make a record of 310 thrusts in ten minutes

Sangli News : दासनवमी उत्सवानिमित्त सांगलीतील श्री समर्थ व्यायामशाळेमध्ये जोर मारण्याच्या स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या. जवळपास मागील ५० वर्षांपासून या जोर मारण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहेत. या वर्षी लहान व मोठ्या अशा दोन गटात स्पर्धा पार पडल्या. आधुनिक व्यायामाच्या युगात पूर्वीपासून चालत आलेल्या जोर, बैठका, सपाट्या, गदा, खोरे यांसारख्या व्यायाम प्रकारांना प्रोत्साहन देण्याचे काम व्यायामशाळेमार्फत केले जात आहे.

चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत केवळ दहा मिनिटात ३१० जोर मारून सांगलीच्या शुभम चव्हाण याने विक्रम नोंदवित प्रथम क्रमांक पटकाविला.

हेही वाचा 👉 डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील; आज करणार शिवसेना प्रवेश….

दहा मिनिटात ३१० जोर मारून सांगलीच्या शुभम चव्हाण याने  प्रथम क्रमांक पटकाविला.

मोठा गट

प्रथम क्रमांक शुभम चव्हाण (१० मिनिटात ३१० जोर)

द्वितीय क्रमांक संतोष तांबट

तृतीय क्रमांक प्रथमेश वैद्य

चतुर्थ क्रमांक अनिकेत कुलकर्णी

लहान गट

प्रथम क्रमांक पार्थ सिद्ध (पाच मिनिटात १२० जोर)

द्वितीय क्रमांक केदार पांडे

सायंकाळ सत्रात ब्रह्मवृंद मंत्रजागर होऊन आमदार सुधीरदादा गाडगीळ व त्वचारोग तज्ज्ञ डॉ. चंद्रशेखर पुरंदरे यांच्या हस्ते बक्षीस समारंभाचा कार्यक्रम पार पडला. संस्थेचे सचिव आंतरराष्ट्रीय शरीर सौष्ठव पंच रामकृष्ण चितळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. रमेश गोवंडे यांनी आभार मानले. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष गुरुनाथ कुलकर्णी, बापू हरिदास, हरी महाबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम