Sangli Water Crisis: काँग्रेसचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा; शहर तसेच ग्रामीण भागातील गंभीर समस्यांबाबत काँग्रेस आक्रमक

2 Min Read
सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर काँग्रेसचा मोर्चा

Sangli Congress Morcha News: जिल्ह्यातील काही तालुक्याना हक्काचे पाणी मिळावे या मागणीसाठी आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी मिळून सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

जिल्ह्यातील काही दुष्काळी भागात पाण्याच्या प्रश्नाची गंभीर समस्या आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आता काँग्रेस आक्रमक झाली आहे. आज माजी मंत्री आमदार डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली शहर व ग्रामीण जिल्हा काँग्रेसतर्फे सांगली कलेक्टर ऑफिसवर धडक मोर्चा काढण्यात आला. विश्रामबाग चौकात असणाऱ्या क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून विश्रामबाग चौक येथून मोर्चाचा प्रारंभ झाला.

म्हैसाळ, आरफळ, टेंभू व ताकारी पाणी योजनांचे उन्हाळी आवर्तन सुरू करुन त्यात सातत्य ठेवावे, चालू लोकसंख्या गृहीत धरून जिल्ह्यात दुष्काळी भागात मुबलक पाणी पुरवठा आवश्यक तेवढ्या टँकरद्वारे करम्यात यावा. ढाणेवाडीची पाणी पुरवठा योजना व शेतीसाठी पाणी पुरवठा करावा. पलूस तालुक्यात कृष्णा कालव्याचे आवर्तन सुरू करावे तसेच आरफळ योजनेतून तात्काळ पाणी मिळावे, विस्तापित म्हैसाळ योजनेचे काम युध्दपातळीवर पूर्ण करून म्हैसाळ योजनेचे आवर्तन बिनशर्त ठेवावे, सांगली महापालिका क्षेत्रात शुध्द व मुबलक पाणी पुरवठा करण्यात यावा, कृष्णा नदी पावसाळ्यापर्यंत वहाती ठेवावी व पाणी उपसा बंदी करु नये.

जिल्ह्यातील जत, आटपाडी, खानापूर, कवठेमहांकाळ व अन्य काही भागात चारा टंचाई निर्माण झाली आहे. अशा ठिकाणी मुक्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यात याव्यात. अशा विविध मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आल्या.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम