Sangli News : उन्हाळ्यापूर्वीच सुरु झाला जिल्ह्यातील ६१ गावांना टँकरने पाणी पुरवठा

1 Min Read
Water supply by tanker to 61 villages of Sangli district started before summer

Sangli News : आता कुठे थंडीचा हंगाम संपत आला असतानाच पाणी टंचाईच्या झळा बसू लागल्या असून सांगली जिल्ह्यातील जत व आटपाडी तालुक्यातील सुमारे ६१ गावांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने बुधवारी देण्यात आली. या गावातील १ लाख २९ हजार ५५६ लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरच्या पाण्याचा वापर करावा लागत आहे. जत तालुक्यातील पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या ५८ तसेच आटपाडी तालुक्यात ४ गावे आहेत. सध्या जतमध्ये  ५४  तर आटपाडी तालुक्यात ३ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. या दोन तालुक्यातील ६१ गावे आणि ४११ वाडी वस्तींना सध्या टँकरने पाणी पुरविण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाकडून संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा शासनाला सादर करण्यात आला असून यामध्ये विविध उपाय योजनांसाठी ३१ कोटी ४६ लाख रूपये खर्च अपेक्षित धरला गेला आहे. त्याच बरोबर ताकारी, म्हैसाळ, टेंभू या सिंंचन योजनांचे वीज वापराचे ४५ कोटींचे देयक टंचाई निधीतून देण्यात येणार आहे. पाणी टंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाय योजनांचा आराखडा तयार करण्यात आला असून यामध्ये नवीन विंधन विहीर घेणे, तात्पुरत्या पूरक नळ योजनांना मान्यता देणे, विहीरींचे अधिग्रहण करणे आदी उपायांचा समावेश केलेला आहे.

ट्रेंडिंग 👇

Share This Article
कियारा अडवाणी खूपच हॉट दिसत होती या रेड कट-आउट ड्रेसमध्ये दीपिका कक्कर हीला नमाज अदा केल्यामुळे का ट्रोल करत आहेत चाहते? सबसे कातील गौतमी पाटील, हीच खर नाव माहित आहे का? गौतमी पाटील गदर ३ मध्ये या सुंदरींना फिल्म इंडस्ट्रीत मिळू शकले नाही त्यांचे खरे प्रेम