चित्रपट साधारणपणे तीन तासांच्या असल्याचे समजले जाते. तुम्हाला माहित आहे का की हिंदी चित्रपटसृष्टीत असे काही चित्रपट बनले आहेत जे चार ते पाच तासांचे आहेत. चला तर मग पाहू सर्वात लांब बॉलीवूड चित्रपट  कोणते..

7: सलाम ए इश्क सलमान खान आणि प्रियांका चोप्रा यांचा सलाम ए इश्क  हा चित्रपट बॉलीवूडमधील सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनिंग टाइम तीन तास 36 मिनिटांचा आहे.

6: मोहब्बतें मोहब्बतें 2000 मध्ये रिलीज झाला होता. शाहरुख खान, अमिताभ बच्चन, जिमी शेरगिल, उदय चोप्रा, ऐश्वर्या राय, शमिता शेट्टी, प्रीती झांगियानी आणि किम शर्मा यांसारख्या अनेक मोठ्या कलाकारांनी या चित्रपटात भूमिका केल्या होत्या. या चित्रपटाचा रनिंग टाइम तीन तास 36 मिनिटांचा आहे.

5: लगान आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित 'लगान' हा चित्रपट तीन तास 44 मिनिटांचा आहे. ज्यामध्ये आमिर खान, रघुवीर यादव, ग्रेसी सिंग, कुलभूषण खरबंदा आणि राजेंद्र गुप्ता असे अनेक नामांकित स्टार्स एकत्र दिसले होते.

4: संगम राज कपूर, वैजंतीमाला आणि राजेंद्र कुमार यांचा 1964 साली प्रदर्शित झालेला संगम हा चित्रपट तीन तास 58 मिनिटांचा आहे.

3: एलओसी: कारगिल 2003 मध्ये प्रदर्शित झालेला जेपी दत्ता यांचा एलओसी: कारगिल हा चित्रपट चार तास 15 मिनिटांचा आहे.

2: मेरा नाम जोकर राज कपूर यांच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक 'मेरा नाम जोकर' जो हिंदी चित्रपटसृष्टीतील सर्वात लांब चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा रनटाइम चार तास 15 मिनिटांचा आहे. हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला तेव्हा चित्रपटगृहांमध्ये एकदा नव्हे तर दोनदा मध्यांतर होते.

1: गँग्स ऑफ वासेपूर गँग्स ऑफ वासेपूर हा भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठा चित्रपट आहे. दिग्दर्शक अनुराग कश्यपचा हा चित्रपट पाच तास २१ मिनिटांचा होता. सगळ्या थिएटर्सनी एवढा मोठा चित्रपट प्रदर्शित करण्यास नकार दिला होता, त्यानंतरच चित्रपटाचे दोन भाग करण्यात आले. चित्रपटातील अनेक दृश्येही काढून टाकण्यात आली.आणी मग अवघ्या तीन महिन्यांच्या अंतराने चित्रपटाचे दोन्ही भाग प्रदर्शित केले गेले.

🔉 दिशा पटानीचे ‘योद्धा’ च्या स्क्रीनिंग दरम्यानचे सुपर किलर हॉट फोटोज पाहा 👇